शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला जा! भीक मागणाऱ्या मुस्लिम व्यक्तीस मुलासह मारहाण, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 21:53 IST

Beaten in Ajmer :पोलिसांनी हे देखील सांगितले की, आरोपी म्हणतात की, हे लोक गुन्हा करून आले असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.या संशयामध्ये त्यांनी या कुटुंबाला मारहाण केली.

ठळक मुद्देतपासादरम्यान असे आढळून आले की, ललित नावाच्या व्यक्तीने काही मित्रांसह ही घटना घडवून आणली. या व्यक्तीला २० तारखेलाच अटक करण्यात आली.

नवी दिल्ली - अजमेरमध्ये भीक मागत असलेल्या एका मुस्लीम कुटुंबातील दोन लोकांसोबत मारहाणीचे प्रकरण समोर आले आहे. आरोपींनी त्यांना मारहाण केली आणि पाकिस्तानला जाण्यास सांगितले. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक मुस्लिम संघटनांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ही घटना रामगंज पोलीस स्टेशन परिसरातील आहे. सतर्कता दाखवत पोलिसांनी पाच जणांना अटकही केली आहे. 

 

हे मुस्लिम कुटुंब उत्तर प्रदेशच्या कानपूरचे आहे. हे कुटुंब रामगंज पोलीस स्टेशन परिसरातील सुभाष नगरमध्ये भीक मागत होते, तिथे पाच जणांनी त्यांना नाहक त्रास दिला. या लोकांना मारहाण करून पाकिस्तानात जाण्यास सांगितले. हे कुटुंब ऑडिओमध्ये एक गाणे वाजवून भीक मागत होते. 

एसएचओ सतेंद्र सिंह नेगी यांनी सांगितले की, ही घटना २० ऑगस्ट २०२१ ची आहे. सोशल मीडियाद्वारे एक व्हिडिओ निदर्शनास आला, ज्यात मुस्लिम माणसाला काही लोकांनी मारहाण केली. या प्रकरणात कोणीही एफआयआर नोंदवला नव्हता, या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले. तपासादरम्यान असे आढळून आले की, ललित नावाच्या व्यक्तीने काही मित्रांसह ही घटना घडवून आणली. या व्यक्तीला २० तारखेलाच अटक करण्यात आली. चौकशी केल्यानंतर दुसऱ्या चार आरोपींना दुसऱ्या दिवशीही अटक करण्यात आली. या पाच जणांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पीडितांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला पण ते अद्याप सापडले नाहीत. कदाचित ते परत गेले. पोलिसांनी हे देखील सांगितले की, आरोपी म्हणतात की, हे लोक गुन्हा करून आले असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.या संशयामध्ये त्यांनी या कुटुंबाला मारहाण केली.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आरोपी एका भीक मागणाऱ्या कुटुंबाला मारहाण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आरोपी मारहाण करताना दिसत आहेत की, ते  सोनसाखळी काढून घेऊन पळून जातात. पाकिस्तानला जा, तिथे भीक मागायला मिळेल असे म्हणत आरोपी त्यांच्या खिशातून पैसे काढून या लोकांची तपासणीही करत आहेत. ते वारंवार सांगत आहेत की, इथे येऊ नका. या व्हिडिओबाबत सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशRajasthanराजस्थानPoliceपोलिसArrestअटक