शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"२० कोटी द्या अन्यथा जीवे मारू"; प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींना धमकीचा ईमेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 10:23 IST

मुकेश अंबानी यांच्या सिक्युरिटी इन्चार्जच्या तक्रारीवरून मुंबईच्या गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

मुंबई  - देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे मालक आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानं खळबळ माजली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानींकडे २० कोटी रुपयांची मागणी केली आहे. पैसे न मिळाल्यास जीव घेऊ असं अंबानींना धमकावलं आहे. त्यामुळे मुकेश अंबानींची सुरक्षा आणखी चोख करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबरला मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या ईमेल आयडीवर एका अज्ञात आयडीवरून ईमेल मिळाला आहे. त्यात मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या ईमेलमध्ये लिहिलंय की, If you don’t give us 20 Crore rupees, we will kill you, we have the best shooter in India’ हा ईमेल मिळाल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या सिक्युरिटी इन्चार्जच्या तक्रारीवरून मुंबईच्या गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात कलम ३८७, ५०६(२) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातही मुंबईच्या सर एचएन रिलायन्स फाऊंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. त्याने हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. तेव्हा कॉल करणाऱ्याने मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानीचे नाव घेऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याचसोबत मुकेश अंबानींचे निवासस्थान असलेला एंटिलिया बंगलाही उडवण्याची धमकी दिली होती.

२०२१ मध्ये एंटिलिया बंगल्याबाहेर सापडली होती स्फोटकं

फेब्रुवारी २०२१ मध्ये मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस अवस्थेत एक कार सापडली होती. जेव्हा या कारची पोलिसांनी पाहणी केली तेव्हा त्यात जिलेटिनच्या कांड्या आढळल्याने खळबळ माजली. जवळपास २० जिलेटिन कांड्या आणि एक निनावी पत्र या कारमध्ये सापडले. त्या पत्रात मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची तातडीने दखल घेत पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. त्यात एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश होता.

 

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीMumbai policeमुंबई पोलीस