पिंपरी : प्रियकर तरुणाने लग्नास नकार दिल्याने 'लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सांगवी परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी मागील काही वर्षांपासून एका तरुणासोबत 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये राहत होती. दरम्यान, तरुणाचे नुकतेच लग्न ठरले असल्याने तरुणी नैराश्यात होती. 'माझ्याशी लग्न कर' असे ती त्याला वारंवार म्हणत होती. मात्र तरुणाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने राहत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारली. तरुणीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सांगवीत प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 16:32 IST
'लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
सांगवीत प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या
ठळक मुद्देतरुणाचे नुकतेच लग्न ठरले असल्याने तरुणी नैराश्यात