लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कामठी) : कामठी तालुक्यातील शिरपूर शिवारात वीटभट्टीच्या डबक्यात पडून चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. डुकेश्वरी वसंत सहाणे असे मृत बालिकेचे नाव आहे. सोमवारी (दि.१८) नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. इकडे बालिकेच्या आईने बालिकेवर अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसात नोंदविल्याने याप्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे.प्राप्त माहितीनुसार मृत बालिका डुकेश्वरी वसंत सहाणे ही मूळची छत्तीसगड राज्यातील इगतपुरी येथील राहणारी आहे. मोलमजूरी करणाऱ्या आईवडिलांसह गत सोमवारी कामठी तालुक्यातील शिरपूर येथील राजू जुगले यांच्या वीटभट्टीवर काम करण्यासाठी सहाणे कुटुंब आले होते. आईवडील कामात असताना अडीच वर्षीय लहान भाऊ तोषण सोबत डुकेश्वरी खेळत होती. सोमवारी दुपारी १२ वाजता दरम्यान डुकेश्वरी आईकडे धावत जाऊन मातीचे बाहुले बनवून मागण्याची जिद्द करू लागली. यावेळी तिची आई कामात असल्याने ती खेळता खेळता दूर गेली. मात्र बराच वेळ होऊन ती परत न आल्याने आई लक्ष्मी व वडील वसंत यांनी तिचा शोध घेतला. बराच वेळ होऊन तिचा शोध न लागल्याने आईवडिलांची धाकधूक वाढली. यातच वीटभट्ट मालक राजू जुगले यांनी कदाचित नजीकच्या डबक्यात पडली असावी असा अंदाज व्यक्त केला. यानंतर वसंत यांनी येथील पाण्याच्या डबक्यात पाहणी केली असता डुकेश्वरीचा मृतदेह तिथे दिसून आला. यावेळी पोलीस कार्यवाही तसेच वैद्यकीय शवविच्छेदन प्रक्रिया टाळण्यासाठी राजू जुगले यांच्या सल्ल्यावरून बालिकेचा मृतदेह कंत्राटी जागेतील मोकळ्या जागेत पुरुन अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर या प्रकरणाची अधिक चर्चा होऊ नये म्हणून राजू जुगले यांनी मृत बालिकेच्या आईवडिलांना दहा हजार रुपयाची मदत देत त्यांच्या मूळ गावी जाण्यास सांगितले. यानंतर जुगले यांनी त्यांना इतवारी रेल्वे स्टेशनपर्यंत आणून दिले.आई पुन्हा परतली...वीटभट्टी मालकाने इतवारी रेल्वे स्थानकावर आणून दिल्यानंतर मृत बालिकेची आई लक्ष्मी यांना मुलीच्या मृत्यूबाबत शंका निर्माण झाली. त्यामुळे तिने पतीसह इतवारी येथून शांतिनगर पोलीस स्टेशन गाठले. मात्र या प्रकरणाचे घटनास्थळ कामठी पोलीस स्टेशन येत असल्याने ते सोमवारी रात्री कामठीत दाखल झाले. यानंतर त्यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बकाल यांची भेट घेत झालेल्या प्रकार सांगत मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार नोंदविली.पुरलेला मृतदेह बाहेर काढला
बालिकेचा डबक्यात पडून मृत्यू की घातपात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 20:18 IST
कामठी तालुक्यातील शिरपूर शिवारात वीटभट्टीच्या डबक्यात पडून चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. बालिकेच्या आईने बालिकेवर अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसात नोंदविल्याने याप्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे.
बालिकेचा डबक्यात पडून मृत्यू की घातपात?
ठळक मुद्देनागपूरनजीकच्या शिरपूर वीटभट्टी येथील घटनामुलीच्या आईची अत्याचाराची तक्रार