गर्लफ्रेन्डला गोव्याला फिरायला न्यायचं होतं म्हणून बनले बाईक चोर, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 16:30 IST2021-10-12T16:29:29+5:302021-10-12T16:30:05+5:30
Delhi Crime News : सूचनेच्या आधारावर पोलिसांनी सापडा रचला. दीपक उर्फ नोनी जसा पूजा पार्कमध्ये पोहोचला पोलिसांनी त्याला धरला.

गर्लफ्रेन्डला गोव्याला फिरायला न्यायचं होतं म्हणून बनले बाईक चोर, दोघांना अटक
देशाची राजधानी दिल्लीतील द्वारका पोलिसांनी दोन अशा चोरांना अटक केलीये, जे त्यांच्या गर्लफ्रेन्डला गोव्याला फिरायला नेण्यासाठी दोनचाकी वाहने, ऑटोरिक्षा चोरी करत होते. पकडण्यात आलेल्या चोरांकडे चार स्कूटी आणि एक बाइक सापडली आहे. तसेच चोरांनी त्यांच्याकडून ९५०० रूपये नगद, चोरीचा मोबाइल फोन ताब्यात घेतला.
मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांना सूचना मिळाली की, महावीर एनक्लेव, डाबरी दिल्लीचा दीपक उर्फ नोनी दादा देव हॉस्पिटल डाबरीजवळ छठ पूजा पार्कमध्ये एका सहकाऱ्यासोबत येणार. जर सापडा रचला तर त्यांना पकडता येऊ शकतं. दीपकने स्नॅचिंग, बाइक चोरी केल्याची सूचनाही पोलिसांकडे होती.
सूचनेच्या आधारावर पोलिसांनी सापडा रचला. दीपक उर्फ नोनी जसा पूजा पार्कमध्ये पोहोचला पोलिसांनी त्याला धरला. दीपकसोबतच दिल्ली पोलिसांनी करण नावाच्या व्यक्तीलाही अटक केली. चौकशी दरम्यान आरोपीनी हे सांगितलं की, त्यांना त्यांच्या गर्लफ्रेन्ड गोव्याला फिरायला न्यायचं होतं.
आरोपींनी सांगितलं की, ते त्यांच्या गर्लफ्रेन्डला गोव्याला फिरायला नेण्यासाठी ऑटो लिफ्टर बनले. दीपक उर्फ नोनी आणि करणकडून चोर केलेली स्कूटी व बाईक ताब्यात घेतली गेली. दीपकचं वय १९ आणि करण वय २५ वर्षे आहे.