मैत्रिणीला दारू पाजून केला सामूहिक बलात्कार; दोन्ही आरोपी फरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 08:37 IST2023-02-22T08:36:55+5:302023-02-22T08:37:12+5:30

केरळमधील घटना, सदर मुलगी महाविद्यालयात विमनस्क अवस्थेत असल्याचे प्रशासनाला लक्षात येताच त्यांनी तिचे समुपदेशन केले.

Girlfriend was gang-raped with alcohol; Both the accused are absconding in Kerala | मैत्रिणीला दारू पाजून केला सामूहिक बलात्कार; दोन्ही आरोपी फरारी

मैत्रिणीला दारू पाजून केला सामूहिक बलात्कार; दोन्ही आरोपी फरारी

तिरुवनंतपुरम - केरळमधील कोझिकोडमध्ये दोन मुलांनी आपल्या मैत्रिणीला बळजबरीने दारू पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नर्सिंग अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी या दोन्ही मुलांना त्यांच्या भाड्याच्या घरात भेटण्यासाठी गेली होती.

सदर मुलगी महाविद्यालयात विमनस्क अवस्थेत असल्याचे प्रशासनाला लक्षात येताच त्यांनी तिचे समुपदेशन केले. त्यात तिने आपल्यावरील सामूहिक बलात्काराबद्दल सांगितले. प्रशासनाने मुलीच्या पालकांना याची माहिती दिली, त्यानंतर मुलीने कोझिकोड येथील कसाबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यातील एक आरोपी कोझिकोड येथील आहे, तर दुसरा एर्नाकुलम येथील विद्यार्थी आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दोघांचे सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले आहे. लवकरच आरोपींना जेरबंद करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

घरात सोडून पळ काढला
मुलगी एर्नाकुलम जिल्ह्यातील आहे. तिच्या मित्रांनी बोलावल्यामुळे ती कोझिकोड येथील त्यांच्या घरी गेली होती. ते दोघे आधीच दारूच्या नशेत होते. त्यांनी मुलीला बळजबरीने दारू पाजली आणि ती बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर दोन्ही मुलांनी मुलीला त्यांच्या घरात सोडून पळ काढला. सकाळी जेव्हा मुलीला शुद्ध आली तेव्हा तिने तिच्या मित्राला फोन केला आणि घटना सांगितली. त्याने तिला तेथून जाण्यास मदत केली.

Web Title: Girlfriend was gang-raped with alcohol; Both the accused are absconding in Kerala