प्रेयसीने लग्नास नकार दिला; पठ्ठ्याने अडीज कोटींचे घर कवडीमोलाने विकले, लुटारू बनला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 08:31 AM2020-12-09T08:31:42+5:302020-12-09T08:34:09+5:30

Crime News: आरोपीने चौकशीत दिलेली माहिती पोलिसांना धक्का देणारी होती. प्रेमभंगानंतर अभिषेक गुन्हेगारीकडे वळल्याचे त्यांना समजले.

Girlfriend refused to marriage; Youth sold a house worth Rs 2.5 cr in 14 lacks, robbery | प्रेयसीने लग्नास नकार दिला; पठ्ठ्याने अडीज कोटींचे घर कवडीमोलाने विकले, लुटारू बनला

प्रेयसीने लग्नास नकार दिला; पठ्ठ्याने अडीज कोटींचे घर कवडीमोलाने विकले, लुटारू बनला

Next

छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील पोलिसांना मोठे यश हाती लागले आहे. एका वर्षाच्या आत भिलाई, दुर्ग आणि रायपूरमध्ये ५० हून अधिक लूटपाट करणाऱ्या अटट्ल चोराला अटक करण्यात आली आहे. पोलिसांची टीम आरोपी अभिषेक जोशीच्या दोन महिन्यांपासून मागावर होती. त्याचे घर नसल्याने तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने १७ गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच आरोपीने विकलेले एक डझन फोन ताब्यात घेण्यात आले आहेत. 


आरोपीने चौकशीत दिलेली माहिती पोलिसांना धक्का देणारी होती. प्रेमभंगानंतर अभिषेक गुन्हेगारीकडे वळल्याचे त्यांना समजले. प्रेय़सीने लग्नासाठी नकार दिल्यानंतर त्याने अडीज कोटींचा बंगला केवळ १४ लाखांना विकला होता. यानंतर तो अट्टल लुटेरा बनला होता. प्रेयसीवरचा राग आणि बदला तो महिला आणि मुलींना लूटून घेत होता. त्याने आतापर्यंत वर्षभरात असे ५० प्रकार केले. याशिवाय भिलाईमध्ये आरोपीने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीला चाकू मारून लुटालूट केली होती. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने ऑक्टोबरच्या महिन्यात सुपेला, भिलाईनगरसह अन्य राज्यांमध्ये गुन्हे केले होते. पोलिसांनी आरोपीला पकडण्य़ासाठी सीसीटीव्ही फुटेज चेक केले होते. फुटेजमध्ये त्याची ओळख पटली. त्याच्याकडे वेगळ्याच अशा लाल रंगाची कार होती. पोलिसांनी रायपूरचे देवेंद्र नगर, त्याचे येण्या-जाण्याची ठिकाणे, कुम्हारी टोल प्लाझासह अनेक ठिकाणी चौकशी केली.


आरोपीची माहिती मिळताच पोलिसांनी रायपूरच्या हॉटेल संचालकाशी संपर्क केला. हॉटेल स्टाफ बनून पोलिसांनी त्या हॉटेलची प्रत्येक  खोली चेक केली. ग्राहकांची चौकशी केली. जेव्हा पोलीस आरोपीच्या दरवाजावर पोहोचले तेव्हा त्यांनी त्याच्याकडे आयकार्ड मागितले. आरोपीने दरवाजा उघडताच पोलिसांनी त्याला पकडले. यानंतर त्याने केलेल्या चोऱ्यांचा मुद्देमाल हस्तगत करण्यास सुरुवात झाली. 


कॉलेजमध्ये झाले प्रेम
कॉलेजमध्ये शिकत असताना त्याची मैत्री एका मुलीसोबत झाली होती. दोन्ही एकमेकांवर प्रेम करत होते. त्यांना लग्नही करायचे होते. मात्र, त्याच्या आई-वडिलांचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर प्रेयसीनेही त्याला लग्नास नकार दिला. तसेच तीने घरच्यांच्या सांगण्यावरून लग्न केले. य़ामुळे दु:खी झालेल्या अभिषेकने आठ वर्षांपूर्वी अडीज कोटींचा बंगला कवडीमोलाने विकून गुन्हेगारीच्या दुनियेत पाऊल ठेवले होते. 
 

Web Title: Girlfriend refused to marriage; Youth sold a house worth Rs 2.5 cr in 14 lacks, robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.