लग्न ठरल्यानंतर एक्स बॉयफ्रेंड विरोधात तरूणीची पोलिसात तक्रार, 15 दिवसांवर आलं होतं तिचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 14:35 IST2022-12-21T14:35:20+5:302022-12-21T14:35:30+5:30

Crime News : इंदुरमधील एका तरूणीने तिच्या एक्स बॉयफ्रेंड विरोधात छेडछाड केल्याची केस दाखल केली. तरूणीचं लग्न होणार आहे आणि तिला भिती आहे की, तरूणाच्या वागण्यामुळे तिचं लग्न मोडू शकतं.

Girlfriend filled complaint against ex boyfriend before her marriage in Indore | लग्न ठरल्यानंतर एक्स बॉयफ्रेंड विरोधात तरूणीची पोलिसात तक्रार, 15 दिवसांवर आलं होतं तिचं लग्न

लग्न ठरल्यानंतर एक्स बॉयफ्रेंड विरोधात तरूणीची पोलिसात तक्रार, 15 दिवसांवर आलं होतं तिचं लग्न

Girlfriend Boyfriend Case : अशा तर अनेक घटना समोर आल्या आहेत की, जेव्हा तरूणीचं लग्न ठरतं तेव्हा गोंधळ घालण्यासाठी तिच्या लग्नात तिचा बॉयफ्रेंड पोहोचतो. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या इंदुरमधून समोर आली आहे. जेव्हा तरूणीचं लग्न ठरलं तेव्हा तिला भिती होती की, तिचा एक्स बॉयफ्रेंड तिच्या लग्नात काही गोंधळ घालणार नाही ना. याच कारणाने तिने त्याच्याविरोधात पोलिसात छेडछाड केल्याची तक्रार दाखल केली. लग्न मोडण्याच्या भितीने तरूणीने तिच्या एक्स बॉयफ्रेंड विरोधात तक्रार दाखल केली.

इंदुरमधील एका तरूणीने तिच्या एक्स बॉयफ्रेंड विरोधात छेडछाड केल्याची केस दाखल केली. तरूणीचं लग्न होणार आहे आणि तिला भिती आहे की, तरूणाच्या वागण्यामुळे तिचं लग्न मोडू शकतं. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

हिंमत नगरमधील आकाश विरोधात ही केस दाखल करण्यात आली आहे. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडनेच ही केस दाखल केली. पोलिसांनी सांगितलं की, तरूण सतत तिच्या घराच्या आजूबाजूला फेऱ्या मारत होता. तिचा पाठलाग करून तिचा छेडत होता. तरूणीचं 15 दिवसांनंतर लग्न होणार आहे.

तरूणीला शंका होती की, तरूणाच्या या वागण्यामुळेच तिचं लग्न मोडू शकतं. अशात तरूणीने पोलिसात जाऊन त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनुसार, आरोपी तरूणावर याआधीही तीन केसेस आहेत. तरूणीने सांगितलं की, आधी तरूणासोबत तिची ओळख होती. काही आक्षेपार्ह फोटो त्याच्या मोबाइलमध्ये असू शकतात. यांच्या आधारावरच तो ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो.

Web Title: Girlfriend filled complaint against ex boyfriend before her marriage in Indore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.