गर्लफ्रेंडने गर्भपातास नकार दिला; तरुणाने कंपास, ब्लेड, दगडांनी हल्ला केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 08:44 IST2024-01-14T08:44:10+5:302024-01-14T08:44:23+5:30

राजधानी दिल्लीमध्ये १९ वर्षीय गर्भवती तरुणीवर तिच्या बॉयफ्रेंडने जिवघेणा हल्ला केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली ...

Girlfriend Denies Abortion; The young man attacked with compasses, blades, stones | गर्लफ्रेंडने गर्भपातास नकार दिला; तरुणाने कंपास, ब्लेड, दगडांनी हल्ला केला

गर्लफ्रेंडने गर्भपातास नकार दिला; तरुणाने कंपास, ब्लेड, दगडांनी हल्ला केला

राजधानी दिल्लीमध्ये १९ वर्षीय गर्भवती तरुणीवर तिच्या बॉयफ्रेंडने जिवघेणा हल्ला केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. ती गर्भपात करत नाही म्हणून तिच्यावर कंपास, ब्लेड आणि दगडांनी हल्ला केला. 

योगेश डेढा असे आरोपीचा नाव असून तरुणी व तो एकाच भागात राहत होते. तरुणी एका आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये काम करत होती. तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत चिल्ला गावातील अग्निशमन दलाच्या केंद्राजवळ मिळाली. तरुणीला लोक नायक हॉस्पिटलमध्य़े दाखल करण्यात आले आहे. जगण्यासाठी तरुणी धडपड करत असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. 

डेढा देखील चिल्ला गावातीलच रहिवासी आहे. तरुणी मृत झाल्याचे त्याला वाटल्याने तिला तिथेच टाकून तो पसार झाला होता. शनिवारी तरुणाला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. 

गेल्या तीन वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. जेव्हा मुलीने डेढाला मुलाला जन्म देणार आहे असे सांगितले, तेव्हा त्यांच्यात वाद सुरू झाला. डेढा मुलीवर गर्भपातासाठी दबाव आणत होता. तसेच तिला गोळ्या खायला देत होता. ज्यामुळे गर्भपात होऊ शकला असता. 
 

 

Web Title: Girlfriend Denies Abortion; The young man attacked with compasses, blades, stones

टॅग्स :Womenमहिला