दुसऱ्या मुलीशी लग्न करणाऱ्या बॉयफ्रेंडला ४ दिवसांतच गर्लफ्रेंडनं दिली क्रूर शिक्षा; पोलीसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 05:26 PM2021-06-13T17:26:05+5:302021-06-13T17:27:39+5:30

त्यानंतर या युवकाचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न झालं. त्यामुळे प्रेयसी चांगलीच संतापली. रागाच्या भरात तिने प्रियकराचा बदला घेण्याचा निर्णय घेतला.

Girlfriend brutally murder his boyfriend who marries another girl in 4 days; Police arrested | दुसऱ्या मुलीशी लग्न करणाऱ्या बॉयफ्रेंडला ४ दिवसांतच गर्लफ्रेंडनं दिली क्रूर शिक्षा; पोलीसही हैराण

दुसऱ्या मुलीशी लग्न करणाऱ्या बॉयफ्रेंडला ४ दिवसांतच गर्लफ्रेंडनं दिली क्रूर शिक्षा; पोलीसही हैराण

Next
ठळक मुद्दे१६ मे रोजी मृत सोनू पटेल याला शेवटचं भेटण्यासाठी प्रेयसीनं त्याला हरगडच्या जंगलात भेटायला बोलावलं.१२ मे रोजी सोनूचं लग्न झालं होतं. लग्नाच्या ४ दिवसानंतर १६ मे रोजी मोबाईल दुरुस्त करण्याच्या बहाण्याने तो घरातून बाहेर पडलाया युवकाची हत्या झाल्याची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांना आरोपीचा शोध सुरू केला.

जबलपूर – मध्य प्रदेशातील जबलपूर येथे लग्नाच्या चौथ्या दिवशी बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह २४ मे रोजी घरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या हरगडच्या जंगलात सापडला आहे. सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करत पोलिसांनी या घटनेचा तपास केला. परंतु आता या प्रकरणात वेगळाच प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोलिसही हैराण झालेत. या युवकानं प्रेयसीला दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यानं त्याचा जीव घेण्यात आला आहे.

पोलीस चौकशीत समोर आलं की, या युवकाने सुसाईड केलं नव्हतं तर त्याची हत्या करण्यात आली आहे. या युवकाला संपवण्यामागे दुसऱ्या कोणाचा हात नसून त्याच्या प्रेयसीचा हात असल्याचं उघड झालं. प्रेयसीनं तिच्या बहिणीसोबत मिळून युवकाची हत्या केली. हत्येमागे प्रेयसीनं जे काही सांगितले ते ऐकून पोलीस चक्रावले. मृत युवकानं प्रेयसीला लग्नाचं वचन दिलं होतं. परंतु त्याने लग्न न करता तिचा विश्वासघात केला.

त्यानंतर या युवकाचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न झालं. त्यामुळे प्रेयसी चांगलीच संतापली. रागाच्या भरात तिने प्रियकराचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १६ मे रोजी मृत सोनू पटेल याला शेवटचं भेटण्यासाठी प्रेयसीनं त्याला हरगडच्या जंगलात भेटायला बोलावलं. त्याठिकाणी काहीतरी अँडव्हेंचर करण्याच्या बहाण्याने तिने सोनूचे हात-पाय आणि तोंड बांधले. त्यानंतर त्याला उलटं करून त्याचं डोकं आणि चेहरा दगडाने ठेचून त्याची निर्घुण हत्या केली.

याबाबत एएसपी ग्रामीण शिवेश सिंह बघेल यांच्यानुसार, २४ मे रोजी हरगडच्या जंगलात एक मृतदेह सापडला. काही अंतरावर या युवकाची बाईक आढळली. या बाईकच्या आधारे युवकाची ओळख सिहोरा गावात राहणारा सोनू पटेल असल्याचं कळालं. १२ मे रोजी सोनूचं लग्न झालं होतं. लग्नाच्या ४ दिवसानंतर १६ मे रोजी मोबाईल दुरुस्त करण्याच्या बहाण्याने सोनू घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या कुटुंबाने याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. याचवेळी २४ मे रोजी हरगडच्या जंगलात एका युवकाचा मृतदेह मिळाल्याची बातमी आली. या युवकाची हत्या झाल्याची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांना आरोपीचा शोध सुरू केला. त्यावेळी मृतकाची पत्नीने नवऱ्याची मैत्रिण मधु हिने शेवटचं भेटण्यासाठी बोलावलं होतं अशी माहिती दिली. त्यानंतर कॉल रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी प्रेयसी मधू आणि तिच्या बहिणीची सखोल चौकशी केली. तेव्हा या दोघींनी हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला.

Web Title: Girlfriend brutally murder his boyfriend who marries another girl in 4 days; Police arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :Policeपोलिस