शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
2
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
3
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
4
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
5
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
6
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
7
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
8
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
9
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
10
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
11
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
12
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
13
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
14
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
15
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
16
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
17
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
18
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

मॉर्निंग वॉकसाठी निघालेली मुलगी घरी परतली नाही, अपहरण करून निर्जनस्थळी नेऊन केला गँगरेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 21:07 IST

Kidnap And Gangrape Case : हे प्रकरण चान्हों पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या तीन तरुणींचा कारमधील तीन तरुणांनी पाठलाग केला.

झारखंडची राजधानी रांचीमध्ये सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचे कारमध्ये अपहरण करून सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्याचबरोबर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींचा शोध सुरू केला आहे.हे प्रकरण चान्हों पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या तीन तरुणींचा कारमधील तीन तरुणांनी पाठलाग केला. त्यातील एका मुलीला गाडीत बसवल्यानंतर निर्जन ठिकाणी नेले. जिथे तिच्यावर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तीन अल्पवयीन मुली मॉर्निंग वॉकसाठी घरातून निघाल्या होत्या. त्यानंतर त्या मुलींच्या मागे एक कार आली. या कारमध्ये तीन तरुण होते. या तिघांनी आधी मुलींचा खूप पाठलाग केला, नंतर एका मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवून एका निर्जन ठिकाणी नेले.तिन्ही तरुणांनी मुलीवर आलटून-पालटून बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे. कसा तरी त्या मुलांच्या तावडीतून सुटलेल्या पीडितेने तिच्या कुटुंबीयांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रांचीमधील सामूहिक बलात्काराच्या या घटनेनंतर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.दुसरीकडे भाजपने या प्रकरणी झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश म्हणाले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था याचा बोजवारा उडाला आहे. कधी डायन बिसाहीच्या नावाखाली तर कधी इतर कोणत्याही घटनेत मॉब लिंचिंगच्या घटनाही घडताना दिसत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक संपुष्टात आला आहे, हे स्पष्ट दिसत आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसJharkhandझारखंड