शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: दैव बलवत्तर म्हणून धावत्या लोकलमधून पडता पडता बचावली तरुणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 19:47 IST

प्रवाशांचे प्रसंगावधान, व्हॉट्स अ‍ॅपवर व्हिडीओ वायरल 

मुंबई - धावत्या लोकलमधील दरवाज्यावर उभी राहून प्रवास करणाऱ्या तरुणीला प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे जीवनदान मिळाल्याचा व्हिडीओ सध्या व्हॉट्स अ‍ॅपवर खूप वायरल होत आहे. संबंधित तरुणीचा तपास सुरु असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली. मात्र, या वायरल व्हिडीओमुळे लोकलवरील दरवाज्यावर उभे राहून स्टंट करणाऱ्या तरुणाईला आवर घालण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.वायरल व्हिडीओनुसार, हेडफोन कानात घालून तरुणी पुरुषांच्या डब्यातुन प्रवास करताना दिसून येत आहे. तसेच वेगात धावत असलेल्या लोकलच्या दरवाज्यावर प्रवास करत होती. काही सेंकदांसाठी तरुणीलोकलच्या बाहेर डोकवली असता विरुद्ध दिशेने जोरदार वेगात लोकल आली. यावेळी तरुणीचा तोल गेल्याने ती दोन लोकलच्यामध्ये पडणार इतक्यात दरवाज्याच्या आतील प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत तिला पकडून लोकलमध्ये सुखरुप खेचून आणि तिचे प्राण वाचवले.वायरल व्हिडीओ बाबत कोणतीही तक्रार अद्याप दाखल आलेली नाही. या व्हिडीओतील तरुणी कोण आणि  हा प्रकार नक्की कोणत्या लोकलमध्ये झाला? कोणत्या स्थानकादरम्यान झाला ? याचा शोध सुरु असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. हा  व्हिडीओ कुर्ला ते ठाणे दरम्यान घडलेला असावा अशी माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

धावत्या लोकलमधून तरुणीला पडताना वाचवण्याची कोणतीही घटना मध्य रेल्वेवर घडलेली नाही. मात्र, या प्रकरणी शोध घेत असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. या घटनेमुळे धावत्या लोकलवरील दरवाज्यावर उभे राहून बाहेर डोकावणे, जीवघेणे स्टंट करणे या प्रकाराला आळा घालण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वेAccidentअपघातSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल