अत्याचारानंतर पीडिता गर्भवती; तीन दिवस चकरा मारल्यानंतर पोलिसांनी नोंदवला गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 17:58 IST2019-11-30T17:54:10+5:302019-11-30T17:58:06+5:30

ओळख वाढवून पिडित गर्भवती तरुणीवर अत्याचार

girl pregnant after rape; Police registered a crime after three days in Ambajogai | अत्याचारानंतर पीडिता गर्भवती; तीन दिवस चकरा मारल्यानंतर पोलिसांनी नोंदवला गुन्हा

अत्याचारानंतर पीडिता गर्भवती; तीन दिवस चकरा मारल्यानंतर पोलिसांनी नोंदवला गुन्हा

ठळक मुद्देपोलिसांनी तक्रार घेण्यास केली टाळाटाळ एका तरुणावर गुन्हा दाखल

अंबाजोगाई-:अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथील  तीस वर्षीय तरुणीवर सतत अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली.या प्रकरणी रिक्षाचालक युवकावर बलात्कार केल्याबद्दल गुन्हा नोंद झाला आहे. विशेष म्हणजे आपल्यावर अत्याचार झाला म्हणून तक्रार दाखल करून घ्या म्हणून पीडित तरुणी व तिच्या नातेवाईकानी पोलिस स्टेशनच्या तीन दिवस चकरा मारल्या होत्या, शेवटी सामाजिक कार्यकर्त्यांच्या दबावाने पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.

अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा चौक येथे पीडित तरुणी एकटी राहते.तिचे दोन विवाहित भाऊ पुणे येथे राहतात.सदरील तरुणी अंबाजोगाई येथील एका हॉटेलमध्ये मजूरी करण्यासाठी येत होती. या वेळी तिची ओळख वाघाळा परिसरात राहणारा बांधकाम मिस्त्री प्रशांत व्यंकट जाधव याच्याशी झाली. अनेक वेळा हे दोघेजण एकाच रिक्षाने अंबाजोगाईला जात असत. प्रशांत याने सदरील पिडित तरुणी एकटी असल्याचे पाहुन तिच्या घरी जाणेयेणे सुरु ठेवले. तिची इच्छा नसताना ही त्याने तिच्या सोबत अनेकवेळा बळजबरी केली. यातूनच ती गरोदर राहिली. 

हा प्रकार तिच्या भावाच्या लक्षात आल्याने भावाने माहिती घेतली असता प्रशांत जाधव याने बळजबरी केल्याचे तरुणीने सांगितले. भावाने तरुणीला  घेऊन पोलीस स्टेशन गाठले व तक्रार नोंदवली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून प्रशांत व्यंकट जाधव याच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार श्रीनिवास सावंत करत आहेत.

पिडितेने तीन दिवस मारले हेलपाटे
आपल्यावर अत्याचार झाला म्हणून पोलिसात तक्रार दाखल करून घ्या म्हणून पीडित तरुणी व तिच्या नातेवाईकानी तीन दिवस चकरा मारल्या.परंतु विविध कारणे सांगुन तक्रार घेतली नाही.अखेर सामाजिक कार्यकर्ते यांच्या दबावाने व वरिष्ठ अधिकारी यांनी सुचना दिल्यास हा गुन्हा नोंद झाला.

Web Title: girl pregnant after rape; Police registered a crime after three days in Ambajogai