'आय लव्ह यू' म्हणाला अन् थेट कोठडीत गेला, रोडरोमियोवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 01:03 PM2020-06-17T13:03:00+5:302020-06-17T14:45:33+5:30

अल्पवयीन मुलीची छेड : गुन्हा दाखल

The girl, I Love You, went into solitary confinement, filing charges against Rodrियोguez | 'आय लव्ह यू' म्हणाला अन् थेट कोठडीत गेला, रोडरोमियोवर गुन्हा दाखल

'आय लव्ह यू' म्हणाला अन् थेट कोठडीत गेला, रोडरोमियोवर गुन्हा दाखल

googlenewsNext

जळगाव : मेडिकल दुकानावर औषधी घेण्यासाठी जात असलेल्या १६ वर्षाच्या मुलीला रस्त्यात अडवून ‘आय लव्ह यु’ म्हणणाऱ्या अमृत उर्फ आबा सखाराम वाणी (३२, रा. इच्छा देवी चौक, जळगाव) या मजनूची बुधवारी थेट पोलीस कोठडीतच रवानगी झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग व बाललैंगिक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली १६ वर्षीय मुलगी मंगळवारी सकाळी ९.३० वाजता शामा फायर कॉम्लेक्समधील मेडिकल दुकानावर औषधी घ्यायला जात असताना अमृत उर्फ आबा वाणी याने तिच्याकडे पाहून ‘आय लव्ह यु’ म्हटला. पीडित मुलीने प्रारंभी याकडे दुर्लक्ष केले. सरळ मेडिकल दुकानावर गेली. तेथून परत येत असताना पुन्हा अमृत याने जोरात आवाज काढून ‘आय लव्ह यु’ म्हटला आणि इतक्यावरच न थांबता त्याने मुलीचा हात पकडला. हा प्रकार पाहून घाबरलेल्या मुलीने धावत जावून आजीला हा प्रकार सांगितला. आजी व इतर नातेवाईकांनी अमृतचे घर गाठून जाब विचारला असता मी काहीच बोललो नाही असा पवित्रा घेतला. दरम्यान, रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस गाठून तक्रार दिली. मानव संसाधन विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील यांनी पीडित बालिकेचा जबाब नोंदविला. त्यानंतर अमृत वाणी याच्याविरुध्द विनयभंग व बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण कायद्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर कॉन्स्टेबल अशोक सनगत, नितीन पाटील, लुकमान तडवी, इमरान बेग व शांताराम पाटील यांनी वाणी याचा शोध घेतला व रात्री उशिरा ताब्यात घेऊन बुधवारी सकाळी अटक केली. तपास उपनिरीक्षक गणेश कोळी करीत आहेत.
 

Web Title: The girl, I Love You, went into solitary confinement, filing charges against Rodrियोguez

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.