उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये तीन अल्पवयीन बहिणींनी इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. १२, १४ आणि १६ वर्षे वयोगटातील या मुलींचा मृत्यू, त्यांची सुसाईड नोट आणि ऑनलाईन कोरियन गेम्सचा अँगल यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. सध्या पोलीस मुलींच्या मोबाईलचा तपास करत आहेत.
या संपूर्ण प्रकरणात मुलींच्या वडिलांनी 'आजतक'शी बोलताना आपल्या मुलींना कोरियन गेम्स आणि संस्कृतीचं वेड असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी असाही दावा केला होता की, मुलींचं 'Killer Queen' नावाचं यूट्यूब चॅनेल आहे. मात्र पोलिसांनी शोध घेतला असता अशा नावाचं कोणतंही यूट्यूब चॅनेल किंवा इन्स्टाग्राम अकाउंट सापडलेलं नाही. वडिलांच्या या विधानांमुळे प्रकरणाचा गुंता अधिकच वाढत चालला आहे.
"प्लीज, आपल्या मुलांना गेम खेळू देऊ नका...", ३ लेकी गमावलेला बाप खचला, ढसाढसा रडला
'कोरियन लव्हर गेम'चे पुरावे नाहीत
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात कोणत्याही प्रकारच्या 'कोरियन लव्हर गेम' किंवा 'ऑनलाइन सुसाईड चॅलेंज'चे ठोस पुरावे मिळालेले नाहीत. मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी किंवा डायरीच्या पानांमध्येही अशा कोणत्याही गेमचा किंवा टास्कचा उल्लेख नाही, जो थेट आत्महत्येला प्रवृत्त करेल. त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे की, जर असं कोणतंही चॅनेल किंवा गेम अस्तित्वात नसेल, तर वडिलांनी तसं का म्हटलं?
कोरियन डिजिटल कंटेंटचं व्यसन
डीसीपी निमिष पाटील यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली आणि कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा केली. त्यांच्या मते, हे प्रकरण 'कोरियन डिजिटल कंटेंट'चे व्यसन आणि त्यापासून अचानक निर्माण झालेला दुरावा याशी संबंधित असू शकतं. घटनास्थळावरून पोलिसांना ८ पानांची एक डायरी मिळाली आहे, जी या तपासातील सर्वात महत्त्वाचा दुवा मानली जात आहे. या डायरीत तिन्ही मुलींनी आपल्या भावना आणि विचार मांडले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मुलींनी त्यात स्पष्टपणे लिहिले आहे की, त्या कोरियन संस्कृतीशी इतक्या जोडल्या गेल्या होत्या की, त्यापासून दूर राहणं त्यांना सहन होत नव्हतं.
जीवघेणा 'कोरियन लव्हर' गेम! प्राची बनली 'डेथ कमांडर'; फोनमध्ये दडलंय 'शेवटच्या टास्क'चं रहस्य
कोरियन संस्कृतीचं वेड
डायरीमध्ये कोरियन संस्कृतीसोबतच K-POP, कोरियन म्युझिक, चित्रपट, शॉर्ट फिल्म्स आणि सिरीजचा वारंवार उल्लेख आहे. एका ठिकाणी इंग्रजीत “WE LOVE KOREAN CULTURE” असंही लिहिलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, ही केवळ आवड नव्हती तर तिचं रूपांतर एका व्यसनात झालं होतं. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून लवकरच सत्य समोर येण्याची शक्यता आहे.
Web Summary : Ghaziabad sisters' suicide case deepens. The father's claims of killer games are unsubstantiated. Police suspect Korean content addiction fueled the tragic act, evidenced by diary entries expressing deep attachment.
Web Summary : गाजियाबाद में बहनों की आत्महत्या का मामला गहराया। पिता का किलर गेम का दावा झूठा। पुलिस को कोरियन कंटेंट की लत का शक, डायरी में गहरे लगाव का सबूत मिला।