शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! दोन्ही चिमुकल्यांची गळा दाबून हत्या करून आईची आत्महत्या; मन सुन्न करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 15:38 IST

Crime News : महिलेने आपल्या पाच वर्षांच्या लेकीचा आणि दीड वर्षांच्या मुलाचा गळा दाबून जीव घेतला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh)  गाझियाबाद (Ghazaibad) एक हृदयद्रावक घटना घडली. लोनी परिसरात राहणाऱ्या एका 25 वर्षीय महिलेने आपल्या दोन्ही चिमुकल्यांची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलांची हत्या केल्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. महिलेने आपल्या पाच वर्षांच्या लेकीचा आणि दीड वर्षांच्या मुलाचा गळा दाबून जीव घेतला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रिय दहिया असं 25 वर्षीय महिलेचं नाव असून ती लोनी बॉर्डर परिसरातील उत्तरांचल कॉलनीमध्ये राहत होती. 18 जुलैच्या संध्याकाळी प्रियानं सर्वात आधी आपल्या पाच वर्षीय मुलीचा गळा दाबला आणि त्यानंतर दीड वर्षांच्या मुलाचा गळा दाबून हत्या केली. दोन्ही मुलांचा जीव घेतल्यानंतर तिने आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. तातडीने तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 

प्रियाने अचानक असं टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. घरामध्ये पती-पत्नी आणि मुलांशिवाय दुसरं कोणीच राहत नव्हतं. आपल्या दोन्ही मुलांचा जीव घेऊन तिने आत्महत्या का केली यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण न झाल्याने एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. 

"मुख्यमंत्रीजी, बेरोजगार असल्याने मी आत्महत्या करतोय; तरुणांना रोजगार द्या"; Video जोरदार व्हायरल

तरुणाने या संदर्भात मुख्यमंत्र्यांना देखील एक पत्र पाठवलं आहे. तसेच आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडीओ तयार केला होता. जो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने "मुख्यमंत्रीजी, माझी तुम्हाला विनंती आहे की, विद्यार्थ्यांना रोजगार द्या. बेरोजगारीमुळे मी आज आत्महत्या करत आहे" असं म्हणत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बेरोजगार तरुणाच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील शेहदखेडी येथे राहणाऱ्या कुंदन राजपूतने 10 जुलै रोजी इंदूरच्या पीथमपूरमध्ये आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वीचा कुंदनचा व्हिडीओ आणि सुसाईड नोट आता समोर आली असून ती जोरदार व्हायरल होत आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यू