शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीतील प्रकार : पॅराशूटमधून उतरलेल्या महिलेचे गूढ मात्र कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 20:49 IST

खेळ म्हणून पॅराशूट उडवल्याची शक्यता 

ठळक मुद्देघणसोली सेक्टर 15 येथील पामबीच मार्गागत शनिवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता.धाडसी खेळ म्हणून प्रशिक्षित महिलेने इमारतीवरुन पॅराशुटद्वारे उड्डाण केल्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.

नवी मुंबई - संशयास्पद पॅराशुट मधून महिला उतरल्याचा प्रकार शनिवारी रात्री घणसोलीत घडला. या प्रकारामुळे परिसरात दहशतवादी उतरल्याच्या शक्यतेने भिती व्यक्त होत आहे. मात्र, धाडसी खेळ म्हणून प्रशिक्षित महिलेने इमारतीवरुन पॅराशुटद्वारे उड्डाण केल्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.

घणसोली सेक्टर 15 येथील पामबीच मार्गागत शनिवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. काही प्रत्यक्षदर्शीनी परिसरात पॅराशुट उडताना पाहुण पोलीसांना माहिती दिली होती. त्यानुसार शनिवारी रात्री व रविवारी दिवसभर पोलीसांनी परिसराची झडाझडती घेतली. यावेळी एका महिलेसह दोन तरुनांनी पॅराशुट पाहिल्याचे पोलीसांना सांगितले. तर एका तरुणाने पॅराशुटमधून उतरलेल्या महिलेकडे चौकशी देखिल केली होती. यावेळी तिने स्पोर्ट अॅक्टीव्हीटी म्हणून आपण पॅराशुट उडवल्याचे सांगुन साथीदारासह निघून गेली. यावरुन पोलीसांनीही ते संशयीत पॅराशुट खेळ म्हणुन उडवले गेल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याची खात्री पटवण्याकरितालोणावळा व मुंबईतील काही पॅराशुट उड्डाण शिकवणाऱ्या संस्थांशी देखिल संपर्क साधला आहे. त्यापैकी काहींनी घटनास्थळी पाहणी करुन खेळ म्हणूनच त्याठिकाणावरुन पॅराशुटद्वारे महिलेने उडी टाकली असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार  श्री समर्थ हाईट या बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या छतावर आढळलेले अनोळखी पायाचे ठसे त्याच महिलेच्या बुटाचे असावेत अशीही शक्यता वर्तवली जात आहे. सदर विदेशी महिलेविषयी पोलीसांना कसलीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र सदर विदेशी महिलेने साहसी खेळ म्हणून त्याठिकाणावरुन उडी टाकली असेल, तर हा प्रयत्न तिच्या जिवावर देखील बेतू शकला असता. इमारतींच्या ज्या दिशेने हे पॅराशुट उडत होते, त्याच्या विरुध्द दिशेने हवेचा वेग असल्याने पॅराशुट स्कायलार्क इमारतीच्या अगदी जवळून गेले. याचवेळी त्या इमारतीच्या 19 व्या मजल्यावरील महिलेने हे पॅराशुट खिडकीतुन पाहिले होते. त्यानुसार सदर महिलेचा शोध सुरु असुन इतरही दृष्टीकोनातुन या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलीस उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी सांगितले. 

घणसोलीतील प्रकार : अज्ञात पॅराशूटमुळे खळबळ

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसTerrorismदहशतवाद