नववर्षाच्या पहिल्याच रात्री तो तरुणीसाठी व्हिडिओ कॉलवर नग्न झाला, अन्...; मुंबईतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 13:07 IST2023-01-04T13:07:15+5:302023-01-04T13:07:25+5:30

याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

Getting naked in front of a young girl's video call cost the young man dearly. | नववर्षाच्या पहिल्याच रात्री तो तरुणीसाठी व्हिडिओ कॉलवर नग्न झाला, अन्...; मुंबईतील प्रकार

नववर्षाच्या पहिल्याच रात्री तो तरुणीसाठी व्हिडिओ कॉलवर नग्न झाला, अन्...; मुंबईतील प्रकार

मुंबई : तरुणीच्या व्हिडीओ कॉलसमोर नग्न होणे तरुणाला भलतेच महागात पडले. कॉलधारकाने व्हिडीओ कॉलवरील फोटोचे स्क्रिनशॉट व्हायरल करण्याची धमकी देत १० हजार रुपये उकळले. पुढे, पैसे देण्यास नकार दिला म्हणून थेट अश्लील व्हिडीओ मित्र व नातेवाइकांना सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना आग्रीपाडा परिसरात घडली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

भायखळा परिसरात राहणारा २९ वर्षीय तरुण थर्टीफर्स्टला सोशल मीडियावर आलिया शर्मा नावाच्या मुलीच्या व्हॉट्सअपवर संपर्कात आला. १ तारखेला तरुणीने त्याला व्हिडीओ कॉल केला. आणि नग्न होण्यास भाग पाडले. त्यानंतर, कॉल कट झाला. पुढे याच संवादाचे स्क्रिनशॉट व्हायरल करण्याची धमकी देत, पैशांची मागणी केली. सुरुवातीला १० हजार रुपये दिले. मात्र, पुढे पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाचे व्हिडीओ मित्र व नातेवाइक यांच्या फेसबुक मेसेंजरवर व्हायरल केले.

Web Title: Getting naked in front of a young girl's video call cost the young man dearly.