शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

लवकरात लवकर फासावर लटकवा! निर्भयाच्या आईची दोषीच्या याचिकेविरोधात कोर्टात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 9:53 PM

दोषी आरोपी अक्षयच्या पुनर्विचार याचिका दाखल असून त्यावर निर्णय येण्याआधी डेथ वॉरंट जारी करू शकत नाही.

ठळक मुद्देनिर्भयाच्या आईने दोषीच्या पुनर्विचार याचिकेमुळे आरोपींच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीस उशीर होत असल्याने याचिका दाखल केली आहे. याचिकेविरोधात निर्भयाच्या आईने देखील पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल केली आहे.

नवी दिल्ली - देशाच्या राजधानीत घडलेलं निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींनी फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्यावी यासाठी निर्भयाच्या आई-वडिलांनी कोर्टाकडे विनंती केली आहे. तर फाशी टाळावी यासाठी दोषी आरोपी अक्षय ठाकूरकडून पुरेपूर प्रयत्न होताना दिसत आहेत. दोषी अक्षयने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. तर या याचिकेविरोधात निर्भयाच्या आईने देखील पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल केली आहे. पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून यावर १७ डिसेंबरला सुनावणी घेण्यात येणार आहे. तर त्यानंतर १८ डिसेंबरला दुपारी २ वाजता निर्भयाच्या आईच्या याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार आहे.निर्भयाच्या आईने दोषीच्या पुनर्विचार याचिकेमुळे आरोपींच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीस उशीर होत असल्याने याचिका दाखल केली आहे. चार दोषी आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच डेथ वॉरंट चारही दोषींविरोधात जारी करण्याबाबत सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. सतीश कुमार अरोरा यांनी पुढे ढकलत १८ डिसेंबरला ठेवली आहे. त्यांनी सांगितले, सर्वोच्च न्यायालयात दोषी आरोपी अक्षयच्या पुनर्विचार याचिका दाखल असून त्यावर निर्णय येण्याआधी डेथ वॉरंट जारी करू शकत नाही.चौघांची उडाली झोप; मारतात फक्त चक्करानिर्भया सामूहिक बलात्कारातील अक्षय, मुकेश आणि मंडोली कारागृहातून तिहार कारागृहात हलविलेला पवन हे तीन दोषींना तिहार कारागृहातील वॉर्ड नंबर - ३ मधील सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तर चौथा आरोपी विनय याला जेल नंबर - ४ मध्ये ठेवण्यात आले आहे. य सर्वांची झोप उडाली आहे. फाशीची तारीख जवळ येत असल्याने यांच्या मानत भीती निर्माण झाली आहे. हे चौघे आपापल्या सेलमध्ये रात्र - रात्र जागून चक्करा मारत असतात. दोषींना औषध देण्यात आले नसून या चौघांना रक्तदाब योग्य राहील अशा पद्धतीचे द्रव आणि घन पदार्थ खाण्यास दिले जात आहेत.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपCourtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय