शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

वाईतील बंगल्यात जर्मन नागरिकांनी लावला गांजा, दोघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 22:42 IST

पोलिसांची कारवाई : वास्तव्यास असणाऱ्या ठिकाणी छापा; सव्वा आठ लाखांचा ऐवज जप्त

ठळक मुद्दे जिल्हा पोलीस दलातील विशेष शाखेला वाईतील नंदनवन कॉलनीमधील श्री विष्णूस्मृती बंगल्यात दोन परकीय नागरिक राहत आहेत. तसेच त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती मिळाली होती.

सातारा : वाई शहरातील एका बंगल्यात वास्तव्यास असणाऱ्या जर्मनीच्या दोन नागरिकांवर गांजाची रोपे लावल्याप्रकरणी पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. तसेच या कारवाईत गांजा रोपे आणि बोंडांसह इतर साहित्य मिळून सुमारे सव्वा आठ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तर संबंधित दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हा पोलीस दलातील विशेष शाखेला वाईतील नंदनवन कॉलनीमधील श्री विष्णूस्मृती बंगल्यात दोन परकीय नागरिक राहत आहेत. तसेच त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंगल्यात छापा टाकला. यावेळी विशेष शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, हवालदार विश्वास देशमुख, सागर भोसले, सुमीत मोरे, चालक संभाजी साळुंखे यांच्यासह वाईचे पोलीस निरीक्षक खोबरे, पोलीस उपनिरीक्षक कदम हेही सहभागी झाले.

छाप्यावेळी पोलिसांना बंगल्यात दोन जर्मन नागरिक आढळून आले. त्यावेळी संबंधितांनी सर्गीस व्हिक्टर मानका (वय ३१) आणि सेवेस्टीएन स्टेन मुलर (वय २५, दोघेही रा. जर्मनी) अशी नावे सांगितली. या बंगल्यात तपासणी केल्यावर गांजाची काही लहान-मोठी रोपे आढळून आली. तसेच गांजाची बोंडेही सापडली. या कारवाईत पोलिसांनी २९ किलो गांजा व बोंडे जप्त केली. याची किंमत २ लाख ३६ हजार ७६० रुपये आहे.त्याचबरोबर या कारवाईत पोलिसांनी कोकोपीट, खते, भुश्याची पोती, केमीकल फवरणीचा पंप, टेबन फॅन, तापमापक दर्शक मिटर, इनव्हर्टर, बॅटºया, पॉली हाऊस, दुचाकी, लॅपटॉप व मोबाइल जप्त केला. या सर्वांची किंमत ८ लाख २१ हजार इतकी आहे.

दरम्यान, संबंधित जर्मन नागरिकांच्या विरोधात वाई पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी घटनास्थळ भेट देत कारवाईबाबत मार्गदर्शन केले.

गोव्यातही एक गुन्हा नोंद...वाईतील या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सातारा मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन दिली. संबंधित जर्मन नागरिकांवर २०१७ मध्ये गोवा येथे एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातून ते जामीनावर सुटले आहेत. वाईतील बंगल्यात ते सव्वा वर्षापासून वास्तव्यास होते. याप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास सुरू आहे, अशी माहितीही पोलीस अधीक्षक बन्सल यांनी या पत्रकार परिषदेत दिली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस