शार्पशूटर ठाण्यात गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 05:32 IST2019-06-27T05:31:45+5:302019-06-27T05:32:04+5:30

आंध्र प्रदेश पोलिसांना मागील एक वर्षापासून गुंगारा देणाऱ्या आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या अहमदनगर, चांदागाव येथील शार्पशूटर सलीम रशीद शेख (२४) याला मुंब्य्रातून अटक केली.

Gazaad in the Sharpshooter Thane | शार्पशूटर ठाण्यात गजाआड

शार्पशूटर ठाण्यात गजाआड

ठाणे : आंध्र प्रदेश पोलिसांना मागील एक वर्षापासून गुंगारा देणाऱ्या आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या अहमदनगर, चांदागाव येथील शार्पशूटर सलीम रशीद शेख (२४) याला मुंब्य्रातून अटक केली. ही कामगिरी ठाणे खंडणीविरोधी पथकाने केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सलीम मुंब्य्रात येणार असल्याची माहिती ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रदीप शर्मा यांना मिळाली. त्यानुसार, सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत, आंध्र प्रदेशचे उद्योगपती महेंद्र सिंग यांनी पुतण्या विक्रमला व्यवसायाची नव्याने शाखा उघडून तो व्यवसाय करायला सांगितले. परंतु, विक्रमने व्यवसायात तोटा दाखवल्याने महेंद यांना राग आला. त्यांनी विक्रमला घरी पाठवून दिले. याचा राग मनात धरून विक्रमने सलीम व त्याच्या साथीदारांना महेंद्र यांच्यावर गोळ्या झाडण्याची सुपारी दिली. सलीमने त्यांची हत्या केल्याची कबुली दिली.

Web Title: Gazaad in the Sharpshooter Thane