गावठी रिव्हॉल्व्हरची तस्करी करणाऱ्यास अटक, 2 कट्टे अन् काडतुसे जप्त

By जितेंद्र कालेकर | Updated: October 3, 2022 20:23 IST2022-10-03T20:22:27+5:302022-10-03T20:23:28+5:30

त्याच्याकडून दोन गावठी कट्टे आणि एक जिवंत काडतूस जप्त केले.

Gavathi revolver smuggler arrested, 2 knives and cartridges seized | गावठी रिव्हॉल्व्हरची तस्करी करणाऱ्यास अटक, 2 कट्टे अन् काडतुसे जप्त

गावठी रिव्हॉल्व्हरची तस्करी करणाऱ्यास अटक, 2 कट्टे अन् काडतुसे जप्त

ठाणे : गावठी रिव्हॉल्व्हरची तस्करी करणाऱ्या विकी विनोद कुमार (२८, रा.मोरना, जि. मुज्जफरनगर, उत्तरप्रदेश) याला अटक केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी सोमवारी दिली. त्याच्याकडून दोन गावठी कट्टे आणि एक जिवंत काडतूस जप्त केले.

गेल्या काही दिवसांपासून कासारवडवली भागात गुन्हेगारांच्या अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी संशयितांवर पाळत ठेवण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण पथकाला दिल्या होत्या. सहायक पोलीस निरीक्षक सहदेव पालवे यांच्या पथकाने २ ऑक्टोबर रोजी सापळा लावून विकी विनोद कुमार याला घोडबंदर रोड भागातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन गावठी कट्टे आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. कासारवडवली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला.

Web Title: Gavathi revolver smuggler arrested, 2 knives and cartridges seized