गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ; फसवणूकप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 08:24 PM2019-11-29T20:24:46+5:302019-11-29T20:36:15+5:30

२००१ साली फ्लॅट बुकींग केल्यानंतर अद्याप फ्लॅट मिळालेले नाहीत.

Gautam Gambhir's problem increases; Supplemental chargesheet filed for fraud | गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ; फसवणूकप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल  

गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ; फसवणूकप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल  

Next
ठळक मुद्देगाझियाबादमधील इंदिरापुरम येथील एका रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बुक करण्यात आले होते.खरेदीदारांचा आरोप आहे की, गंभीरने प्रोजेक्टमध्ये गुंतवणूकीसाठी ग्राहकांना आकर्षित करण्यात कंपनीला मदत केली होती.

नवी दिल्ली - भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आता स्थानिक कोर्टात त्याच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध याआधी देखील साकेत न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. जवळपास ५० फ्लॅटच्या खरेदीदारांनी हा आरोप केला आहे की, २००१ साली फ्लॅट बुकींग केल्यानंतर अद्याप फ्लॅट मिळालेले नाहीत.

गाझियाबादमधील इंदिरापुरम येथील एका रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बुक करण्यात आले होते. मात्र, अद्याप फ्लॅट मिळाले नसल्याचा आरोप खरेदीदारांनी केला आहे. भाजप खासदार गौतम गंभीर रूद्र बिल्डवेल रिअ‍ॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि एचआर इन्फ्रासिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या या प्रोजेक्टचा डायरेक्टर आणि ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर होता. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध २०१६ मध्ये हाउसिंग प्रोजेक्ट बुकिंग करण्याच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार, कंपनीने ६ जून २०१३ रोजी फ्लॅट देण्याचा दावा केला होता. मात्र, २०१४ पर्यंत फ्लॅट देण्यास टाळाटाळ केली. १५ एप्रिल २०१५ मध्ये अधिकाऱ्यांनी काही त्रुटींमुळे प्रोजेक्टची मान्यता रद्द केली. गंभीरशिवाय या प्रकरणात मुकेश खुराना, गौतम मेहरा आणि बबीता खुराना यांचीही नावे आहेत. खरेदीदारांचा आरोप आहे की, गंभीरने प्रोजेक्टमध्ये गुंतवणूकीसाठी ग्राहकांना आकर्षित करण्यात कंपनीला मदत केली होती. यांच्याविरुद्ध भा.दं. वि. कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Gautam Gambhir's problem increases; Supplemental chargesheet filed for fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.