बदलापूरच्या गांधी चौकात गॅरेज चालकाला तरुणांची मारहाण

By पंकज पाटील | Updated: August 17, 2023 19:21 IST2023-08-17T19:20:53+5:302023-08-17T19:21:09+5:30

गांधी चौकातून कर्जत दिशेकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर असलेल्या एका गॅरेज समोर एका तरुणाने आपली दुचाकी गाडी पार केली होती.

Garage driver assaulted by youth in Badlapur's Gandhi Chowk | बदलापूरच्या गांधी चौकात गॅरेज चालकाला तरुणांची मारहाण

बदलापूरच्या गांधी चौकात गॅरेज चालकाला तरुणांची मारहाण

बदलापूर: बदलापुरात गांधी चौकात असलेल्या एका गॅरेज चालकाला गाडी पार्क करण्याच्या वादातून बुधवारी जबर मारहाण करण्यात आली आहे. मात्र या गॅरेज चालकाने कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात केलेली नाही.

गांधी चौकातून कर्जत दिशेकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर असलेल्या एका गॅरेज समोर एका तरुणाने आपली दुचाकी गाडी पार केली होती. बदलापूरच्या मानकिवली परिसरातील हे तरुण असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्किंगच्या वादातून त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दुचाकीस्वराने आपल्या काही सहकाऱ्यांना बोलावत गॅरेज चालक आणि त्याचे सहकार्याला जबर मारहाण केली. या मारहाणीचे सीसीटीव्ही समोर आले असून याबाबत अद्याप कोनावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. 

तक्रारदार तक्रार करण्यासाठी समोर न आल्याने आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही अशी माहिती बदलापूर पोलिसांनी दिली आहे. दुसरीकडे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर संबंधित तरुणांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. मात्र तक्रारदार पोलीस ठाण्यात जात नसल्यामुळे पोलीस देखील बघ्याची भूमिका घेत आहेत.

Web Title: Garage driver assaulted by youth in Badlapur's Gandhi Chowk