शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

Ganpati Festival : गणेशोत्सव, मोहरमसाठी मुंबई पोलीस सज्ज, कडेकोट बंदोबस्त तैनात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 21:39 IST

मुंबई - यंदा गणेशोत्सव आणि मोहरमचा सण शांततेत पार पडावा म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांची सुरक्षा, महिलांची होणारी छेडछाड यासारखे प्रकार रोखण्यासाठी साध्या गणवेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. लालबागच्या राजाचे आणि लालबागमधील गणेश मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता याठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दहशतवादी कारवायांना आला घालण्यासाठी राज्य ...

मुंबई - यंदा गणेशोत्सव आणि मोहरमचा सण शांततेत पार पडावा म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांची सुरक्षा, महिलांची होणारी छेडछाड यासारखे प्रकार रोखण्यासाठी साध्या गणवेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. लालबागच्या राजाचे आणि लालबागमधील गणेश मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता याठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दहशतवादी कारवायांना आला घालण्यासाठी राज्य दहशतवादविरोधी पथक देखील करडी नजर ठेवून असणार आहे. 

मुंबईत यंदा एकूण सार्वजनिक ६ हजार ४५५ गणपती असून, घरगुती १ लाख ५५ हजार ४१४ गणपती असणार आहेत. याबरोबरच गौरी स्थापना ११ हजार ८१३ होणार असून मुंबईतील १६२ ठिकाणी विसर्जन होणार आहे. गर्दीच्या ठिकाणी होणारे गुन्हे रोखण्यासाठी साध्या गणवेशात पोलीस तैनात राहणार आहेत. गर्दीच्या दृष्टिकोनातून मुंबईतील लालबाग, गिरगावसारख्या परिसरात मोठा पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला आहे. गणेश उत्सवादरम्यान सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बिडीडीएस, मुबंई वाहतूक विभाग आणि होमगार्ड यांची मदत घेतली जाणार आहे. मुंबईतील ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून निगराणी केली जाणार आहे. विसर्जनाच्या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र उभारले जाणार आहे. चौपाटीवर लाईफ गार्डस तैनात असून नौदल व कोस्ट गार्डसोबत समन्वय ठेवला जाणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGanpati Festivalगणेशोत्सवPoliceपोलिस