Ganpati Festival : सावधान... लालबाग राजाच्या दर्शनास आलेल्या 135 भाविकांचे मोबाईल लंपास

By पूनम अपराज | Published: September 16, 2018 09:37 PM2018-09-16T21:37:15+5:302018-09-16T23:39:21+5:30

या गणेशोत्सवात देखील या चोरांभोवती फास आवळण्यासाठी काळाचौकी पोलिसांनी चोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

Ganpati Festival: Be careful ... the stolen mobile of 135 pilgrims from Lalbagh Raja's eyes | Ganpati Festival : सावधान... लालबाग राजाच्या दर्शनास आलेल्या 135 भाविकांचे मोबाईल लंपास

Ganpati Festival : सावधान... लालबाग राजाच्या दर्शनास आलेल्या 135 भाविकांचे मोबाईल लंपास

Next

मुंबई - मुंबईत गणपती उत्सवाची धामधूम मोठ्या उत्साहात सुरू आहे. मात्र, गणेशोत्सवात लालबाग परिसरात खासकरून लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड रिघ लागते. याच गर्दीचा फायदा घेऊन खिसेकापू आपला हेतू साध्य करतात. लालबाग परिसरात अन्य ठिकठिकाणी गणपती बाप्पा आपल्या मंडपात विराजमान होऊन चार दिवस उलटले, मात्र गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी हात धुऊन घेतले आहेत. त्यामुळे मोबाइल चोरीची तक्रार देणाऱ्यांची आता काळाचौकी पोलिस ठाण्याबाहेर रिघ लागली आहे. गेल्या चार दिवसात पोलिसांनी तब्बल १३५ मोबाइल चोरीच्या तक्रारी नोंद केल्या आहेत. त्यामुळे बंदोबस्तासोबतच गहाळ झालेल्या मोबाइलच्या तक्रारी नोंदवताना पोलिसांची दमछाक होताना पहायला मिळत आहे.जास्तीत जास्त चोऱ्यांचे प्रकार हे लालबागचा राजा परिसरात घडतात. 

मुंबईच्या गणेशोस्तवात लालबाग, परळ भागातील गणपती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करत असतात. या भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावून देखील भुरटे चोर गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या मौल्यवान वस्तू  हातचलाखीने लंपास करतात. हा संपूर्ण परिसर काळाचौकी पोलिस ठाण्याच्याअंतर्गत येत असल्यामुळे या भागात कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही काळाचौकी पोलिस ठाण्यावर असते. साध्या वेशात पोलिस तैनात  असून देखील सालाबादप्रमाणे यंदाही चोरीच्या घटना कमी होण्याचं नाव घेत नाही.

गणेशोत्सवाच्या चार  दिवसांत काळाचौकी पोलिस ठाण्यात हरवलेले आणि चोरीला गेलेल्या मोबाइलच्या तक्रारींची संख्या आता १३५ वर पोहचली आहे. मागील काही वर्षांचा आढावा घेता एक ठराविक टोळी गणेशोत्सवात चोरीसाठी या भागात दाखल होत असते. सुरत गॅंग आणि यूपी गॅंग अशी या दोन्ही टोळीची ओळख आहे. मात्र , मागील दोन वर्षांत या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं होतं. या गणेशोत्सवात देखील या चोरांभोवती फास आवळण्यासाठी काळाचौकी पोलिसांनी चोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: Ganpati Festival: Be careful ... the stolen mobile of 135 pilgrims from Lalbagh Raja's eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.