शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गणपत गायकवाड जमीन गोळीबार प्रकरण! बिल्डर पुन्हा गावगुंडांना घेऊन आला, पोलिसांना धावत यावे लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 18:20 IST

भाजपाचे आमदार गणपत गायकवाड हे सध्या तुरुंगात आहेत. तर पोलीस ठाण्यातील गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड हे पुन्हा राजकारणात सक्रीय झाले आहेत.

काही महिन्यांपूर्वी पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड प्रकरण शांत होत नाही तोच पुन्हा जमिनीचा वाद उफाळून आला आहे. या जमिनीची मोजणी करण्यासाठी बिल्डर गावगुंडांना घेऊन प्लॉ़टवर पोहोचला होता. पुन्हा एकदा शिंदे गटाचे महेश गायकवाड यांनी पोलिसांना घेत तिथे धडक देत गुंडांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा जमिनीचा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपाचे आमदार गणपत गायकवाड हे सध्या तुरुंगात आहेत. तर पोलीस ठाण्यातील गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड हे पुन्हा राजकारणात सक्रीय झाले आहेत. अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील एका जागेवरील ताबा मिळविण्यावरून हा वाद झाला होता. आता या घटनेचा धुरळा खाली बसताच बिल्डरने जमीन ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरु केल्याचे समोर आले आहे. 

ही वादग्रस्त जमीन मोजणी करण्यास बंदी घातलेली असूनही हा बिल्डर गावगुंडांना बंदुका, धारधार शस्त्रांसह घेऊन आला होता. याची माहिती शेतकऱ्यांनी पुन्हा महेश गायकवाड यांना दिली. महेश गायकवाड आणि शिंदेंचे कार्यकर्ते पोलिसांना घेऊन बिल्डर आलेल्या जमिनीवर पोहोचले. या गुंडांना पकडून पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. यावेळी जमीन मोजणीस विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना गुडांकरवी मारहाणही करण्यात आली आहे. पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. 

गोळीबार कधी झालेला...उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्यात २ फेब्रुवारी रोजी दुपारी शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यासह ६० ते ७० जणांवर द्वारली येथील वादग्रस्त जमिनीवर प्रवेश केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. तर रात्री साडे नऊ वाजता जमीनमालक जाधव कुटुंबाच्या तक्रारीवरून आमदार गणपत गायकवाड यांच्यासह ८ जणांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला. याबाबतच्या चौकशीसाठी हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिन मध्ये सुरवातीला आमदार पुत्र वैभव गायकवाड, त्यानंतर शिवसेना नेते महेश गायकवाड, राहुल पाटील व जमीनमालक चैनू जाधव आले होते. पावणे ११ वाजता आमदार गणपत गायकवाड केबिन मध्ये आल्यावर वैभव गायकवाड केबिन बाहेर गेले. त्यानंतर केबिन बाहेर समर्थकात शिवीगाळ, हाणामारी, धक्काबुकीं व शस्त्र काढण्याचे प्रकार झाले. त्यांना शांत करण्यासाठी पोलीस अधिकारी जगताप केबिन बाहेर गेल्यानंतर, आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. 

टॅग्स :Ganpat Gaikwadगणपत गायकवाडShiv SenaशिवसेनाBJPभाजपाambernathअंबरनाथ