शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'ते' शक्तिप्रदर्शन भोवले; गॅंगस्टर शरद मोहोळला ५ साथीदारांसह पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 14:50 IST

गेल्या महिन्यात कारागृहातून सुटलेला गॅंगस्टर शरद मोहोळ याच्याविरुद्धही खडक पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे.

पुणे: गुंड गजानन मारणे याची ३०० वाहनांच्या ताफ्यासह तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत निघालेली मिरवणूक सर्वत्र चर्चेचा विषय ठरली होती.या मिरवणुकीवरून राज्य सरकार, गृहमंत्री यांच्यासह पोलिसांवर देखील जोरदार निशाणा साधण्यात आला होता. त्यानंतर तळेगाव पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत मारणेसह ९ जणांना अटक केली. आता खडक पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातून बाहेर पडल्यावर जोरदार शक्ती प्रदर्शन करणाऱ्या गुंड शरद मोहोळ याच्यासह ५ साथीदारांना अटक केली आहे.

याप्रकरणी खडक पोलिसांनी गुंड शरद हिरामण मोहोळ (वय ३८), विश्वास बाजीराव मनेरे (वय ३७), मनोज चंद्रकांत पवार (वय ४२),स्वप्निल अरुण नाईक (वय ३५) आणि आणखी एकाला अटक केली आहे. 

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात कारागृहातून सुटलेला गॅंगस्टर शरद मोहोळ याच्याविरुद्धही खडक पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. २६ जानेवारी रोजी एका संघटनेने आयोजित केलेल्या सत्यनारायण पूजेमध्ये शरद मोहोळ व त्याचे समर्थक आले होते. या वेळी बेकायदेशीरपणे लोकांना एकत्र करून परिसरात दहशत निर्माण करणे व कोविड १९ नियमांचे उल्लंघन करणे अशा विविध कलमांखाली शरद माेहोळ व त्याच्या १२ समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शरद मोहोळ हा संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकीच्या हत्या प्रकरणातील आरोपी आहे. पुणे शहरातील मोहोळ टोळीचा तो म्होरक्या आहे. येरवडा तुरुंगातील अंडा सेलमध्ये नाडीने गळा आवळून सिद्दीकीचा खून केल्याचा मोहोळवर आरोप होता. 15 दिवसांपूर्वीच मोहोळची कातिल सिद्दिकीच्या हत्या प्रकरणातून मुक्तता झाली होती. 

कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यासह ९ जणांना अटक 

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर शहरात परतल्यावर कोथरूड परिसरात दहशत निर्माण करणे तसेच कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यासह ९ जणांना अटक केली असून १५० ते २०० समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी