शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

गँगस्टरला मुंबईत पकडले, उत्तर प्रदेशला नेताना वाहनाला अपघात; जागीच मृत्यू

By हेमंत बावकर | Updated: September 28, 2020 08:44 IST

लखनऊच्या ठाकुरगंज पोलीस ठाण्यात 2014 मध्ये गँगस्टर फिरोजविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर फिरोज फरार झाला होता. तपासावेळी फिरोज मुंबईत असल्याचे समोर आले होते.

लखनऊ : विकास दुबे एन्काऊन्टनंतर आज पुन्हा एकदा तशीच घटना उत्तर प्रदेशच्या गँगस्टरसोबत घडली आहे. मुंबईहून पकडण्यात आलेल्या आरोपीला उत्तर प्रदेशचे पोलीस नेत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यामध्ये या गँगस्टरचा जागेवरच मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. 

लखनऊच्या ठाकुरगंज पोलीस ठाण्यात 2014 मध्ये गँगस्टर फिरोजविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर फिरोज फरार झाला होता. तपासावेळी फिरोज मुंबईत असल्याचे समोर आले होते. काही दिवसांपूर्वी फिरोजचा पत्ता मिळाला होता. यामुळे पोलीस निरिक्षक जगदीश प्रसाद पांडेय, हवालदार संजीव सिंह यांनी फिरोजचा अटकेत असलेला सहकारी साढ़ू अफजलला घेऊन मुंबईत आले होते. फिरोज नाला सोपाऱ्याच्या झोपडपट्टीत राहत होता. त्याला अटक करून पोलीस शनिवारी रात्री लखनऊसाठी रवाना झाले होते. रविवारी सकाळी मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यातील चांचौडा ठाणे क्षेत्रात पोलिसांचे वाहन पलटी झाले. या अपघातात गँगस्टर फिरोजचा मृत्यू झाला. 

तर अफजलचा हात मोडला आहे. जगदीश प्रसाद यांनी तेथील पोलिसांना सांगितले की, रस्त्यावर अचानक गाय समोर आली. यामुळे तिला वाचविताना कार पलटी झाली. मात्र, चालकाला झोप आल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुना पोलीस अधिक तपास करत आहेत. 

खासगी वाहनाने केली कारवाईया प्रकरणी ठाकुरगंज पोलिसांची एक मोठी निष्काळजी समोर आली आहे. फिरोजला पकडण्यासाठी पोलिसांची टीम एका खासगी गाडीतून गेली होती. आता यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले असून आरोपींना पकडण्यासाठी जायचे होते तर सरकारी वाहन का नेले नाही, असे विचारण्यात येत आहे. नियमानुसार गुन्हेगाराला पकडण्यासाठी सरकारी वाहनाचा वापर करायला हवा होता. 

 

विकास दुबे एन्काऊंटर

तीन जुलै रोजी झालेल्या चकमकीत आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबे याचा पोलिसांनी १० जुलै रोजी एन्काऊंटर केला होता. दरम्यान, या एन्काऊंटरवर विरोधी पक्ष आणि विविध संघटनांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उत्तर प्रदेश एसटीएफच्या गाडीतून विकासला कानपूरला नेले जात होते. त्यावेळी बर्राजवळ गाडीला अपघात झाला. गाडी उलटल्याने विकास दुबे आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. मात्र यानंतरही विकासने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने एका एसटीएफ अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली. पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितले. मात्र विकासने पोलिसांना जुमानले नाही. यानंतर विकास दुबे आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू झाली. त्यात विकास दुबे मारला गेला.विकास दुबे पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना चकमक सुरू झाली. त्यामध्ये विकास दुबे गंभीर झाला. त्यानंतर त्याला कानपूरच्या हॅलट रुग्णालयात आणण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसMumbaiमुंबई