मुंबई, ठाण्यातून तडीपार केलेला गुंड मोकाट फिरताना पुन्हा जेरबंद!

By जितेंद्र कालेकर | Updated: May 25, 2023 23:58 IST2023-05-25T23:58:03+5:302023-05-25T23:58:14+5:30

गुंडाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केल्याची माहिती गुरुवारी दिली.

Gangster arrested from Mumbai, Thane again jailed while walking freely! | मुंबई, ठाण्यातून तडीपार केलेला गुंड मोकाट फिरताना पुन्हा जेरबंद!

मुंबई, ठाण्यातून तडीपार केलेला गुंड मोकाट फिरताना पुन्हा जेरबंद!

ठाणे : ठाण्यासह मुंबई उपनगरे, मुंबई शहर या तीन जिल्ह्यांमधून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेल्या सचिन शर्मा (२०, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या गुंडाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केल्याची माहिती गुरुवारी दिली. त्याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात कलम १४२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

वागळे इस्टेट भागात राहणाऱ्या शर्मा याच्याविरुद्ध हाणामारीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळेच परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्तांनी मुंबई ठाण्यातून हद्दपार करण्याचे आदेश दि. २७ मार्च २०२२ रोजी दिले होते. तरीही तो वागळे इस्टेट परिसरात पुन्हा विनापरवानगीने मोकाट फिरत असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. 

ही माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या पथकाने अंबिकानगर, वागळे इस्टेट भागातून त्याला दि. २४ मे २०२३ रोजी दुपारी अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिस हवालदार बांगर अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: Gangster arrested from Mumbai, Thane again jailed while walking freely!