शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर सामूहिक बलात्कार करून नराधमांनी काढला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 14:21 IST

Gangrape Case : १८ दिवसानंतर आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देरागाच्या भरात ती भावाच्या गावाकडे जाण्यास निघाली. मात्र तिकीटासाठी पैसे नसल्याने ते पैसे घेण्यासाठी डेहणी शिवारातील शेतात जात होती.

आर्णी (यवतमाळ) : मजुरीचे पैसे घेण्यासाठी शेतात जात असलेल्या ४५ वर्षीय महिलेला नराधमांनी एकट्यात गाठून तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हेतर या अत्याचाराचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियात व्हायरल केला. त्यानंतर या प्रकरणात १८ दिवसांनी आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात एका आरोपीला अटकही झाली आहे. 

दिग्रस तालुक्यातील कलगाव येथे राहणाऱ्या महिलेचे सुनेसोबत वाद झाले. रागाच्या भरात ती भावाच्या गावाकडे जाण्यास निघाली. मात्र तिकीटासाठी पैसे नसल्याने ते पैसे घेण्यासाठी डेहणी शिवारातील शेतात जात होती. दुपारी १२ वाजताच्या सुमारास आराेपी प्रल्हाद आठवले (३९) रा.कलगाव याने बळजबरीने महिलेवर अत्याचार केला. याचे विधीसंघर्षग्रस्त बालकाने मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. नंतर आकीब खाॅ वाजीद खाॅ याने महिलेवर अत्याचार केला. यावेळी महिलेला पोलिसात तक्रार करशील तर तुझा अश्लील व्हिडीओ व्हायरल करून जीवाने ठार केले जाईल, अशी धमकी आरोपींनी दिली. कशीबशी महिलेने आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली. या गंभीर प्रकाराने घाबरलेल्या महिलेने तिच्या आजीकडे सावंगा (ता.दिग्रस) येथे आश्रय घेतला. भीतीपोटी झालेली अत्याचाराची घटना कुणालाच सांगितली नाही. मात्र आरोपींनी तो अश्लील व्हिडीओ मोबाईलवर व्हायरल केला. त्यामुळे सदर महिलेच्या पतीला ही घटना माहीत झाली. त्याने याबाबत पत्नीकडे विचारणा केली. तेव्हा तिने ६ मे रोजी झालेली आपबिती सांगितली. दिग्रस तालुक्यातील घटना असली तरी घटनास्थळ आर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. 

गँगरेप करून मुलीला फेकले विहिरीत; रात्रभर तेथे पडून होती अन्... 

आर्णी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून अमोल प्रल्हाद आठवले (३९), आकीब खाॅ वाजीद खाॅ (२०) दोघेही रा.कलगाव व विधीसंघर्षग्रस्त बालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी अमोल प्रल्हाद आठवले याला सोमवारीच अटक करून पोलीस कोठडीची मागणी केली आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसYavatmalयवतमाळSocial Mediaसोशल मीडिया