संतापजनक! सामूहिक बलात्कारानंतर महिलेचं मुंडण; चपलांचा हार घालून फिरवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 12:57 IST2022-01-27T12:55:59+5:302022-01-27T12:57:42+5:30

पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास सुरू; चार महिलांना अटक

gangrape woman misbehavior garlanded shoes enmity delhi police arrest 4 women | संतापजनक! सामूहिक बलात्कारानंतर महिलेचं मुंडण; चपलांचा हार घालून फिरवलं

संतापजनक! सामूहिक बलात्कारानंतर महिलेचं मुंडण; चपलांचा हार घालून फिरवलं

दिल्ली: देशाच्या राजधानीत एक अतिशय संतापजनक घटना घडली आहे. विवेक विहारमध्ये एका बलात्कार पीडित महिलेचं मुंडण करून तिच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. त्यानंतर तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून तिला गल्ल्यांमध्ये फिरवण्यात आलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला.

महिलेच्या लहान बहिणीनं घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवत ४ महिलांना अटक केली आहे. जुन्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीडित महिला विवाहित आहे. तिला एक लहान मुलगा आहे. 'पीडित महिलेच्या घराच्या मागे राहणारा एक तरुण सतत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. १२ नोव्हेंबरला त्यानं आत्महत्या केली. तरुणाच्या आत्महत्येला शेजारची महिलाच जबाबदार असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी वाटतं,' असं पीडितेच्या बहिणीनं सांगितलं.

पीडित महिला विवेक विहारमध्ये एका भाड्याच्या घरात राहते. चाकूच्या धाकानं तिचं अपहरण करण्यात आल्याचा आरोप तिच्या काकांनी केला. बुधवारी रात्री १२ च्या सुमारास पुतणीचं अपहरण करण्यात आलं. सामूहिक बलात्कारानंतर तिचं मुंडण करण्यात आलं. तिच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून गल्लोगल्ली फिरवण्यात आलं, असा आरोप त्यांनी केला.

Web Title: gangrape woman misbehavior garlanded shoes enmity delhi police arrest 4 women