रिव्हॉल्व्हरच्या धाकावर १३ लाखांची लूट करणारी टोळी जेरबंद, कळवा पोलिसांची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Updated: April 23, 2025 01:09 IST2025-04-23T01:08:39+5:302025-04-23T01:09:51+5:30
राेख रकमेसह सहा लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त...

रिव्हॉल्व्हरच्या धाकावर १३ लाखांची लूट करणारी टोळी जेरबंद, कळवा पोलिसांची कारवाई
ठाणे: चाकू आणि रिव्हाॅल्व्हरच्या धाकावर रिक्षातील प्रवाशांकडून १३ लाखांची राेकड लुटणाऱ्या विवेक वाघमाेडे (२२, रा. कुडूस, पालघर) याच्यासह तिघांना अटक केल्याची माहिती सहायक पाेलीस आयुक्त प्रिया ढमाळे यांनी मंगळवारी दिली. आराेपींकडून लुटीतील पाच लाख २५ हजारांच्या राेकडसह सहा लाख ८५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भिवंडी नाशिक राेडवरील मिल्लत नगर भागातील फळविक्रेते रियाज पठाण (५१) हे १२ एप्रिल २०२५ राेजी रिक्षाने खारेगाव टाेल नाक्याकडून मुंब्य्राच्या दिशेने जाणाऱ्या राेडवरुन जात हाेते. ते कळव्यातील आरएमसी प्लॅन्ट भागात आले असता, माेटारसायकलीवरुन आलेल्या चार सशस्त्र लुटारुंच्या टाेळक्याने त्यांच्या रिक्षाचा पाठलाग केला. या रिक्षाला खारेगाव टाेलनाका ते मुंब्य्राकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर गाठून पठाण यांना चाकू आणि रिव्हाॅल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्याकडील १३ लाखांची राेकड लुटून पलायन केले हाेते. याप्रकरणी कळवा पाेलीस ठाण्यात दराेडयाचा गुन्हा दाखल झाला हाेता. पाेलीस उपायुक्त सुभाष बुरसे आणि सहायक पाेलीस आयुक्त उत्तम काेळेकर यांच्या आदेशाने वरिष्ठ पाेलीस निरीक्षक अशाेक उतेकर यांनी या तपासासाठी एक पथक तयार केले.
सहायक पेालीस िनरीक्षक ज्ञानेश्वर धाेडे यांच्या पथकाने १०० पेक्षा अधिक सीसीटीव्हींची पडताळणी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फैजानअली अन्सारी (४१, रा. भिवंडी, ठाणे) याला अटक केली. पठाण यांची रिक्षा पाच जणांच्या टाेळक्याने मुंब्य्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर निर्जनस्थळी गाठून त्याच्याकडील १३ लाखांची राेकड लुटल्याची कबूली चाैकशीमध्ये दिली. अन्सारी याच्यासह विवेक वाघमाेडे आणि मयूर पाटील अशा तिघांनाही यामध्ये अटक करण्यात आली. त्यांच्याकडून लुटीसाठी वापरलेल्या एक लाख ६० हजारांच्या दाेन माेटारसायकली आणि राेकड असा पाच ल ाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.