शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

रेल्वे स्थानकावर वेगवेगळ्या शकला लढवून प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 20:09 IST

पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्यासाठी शेकडो सीसीटिव्ही तपासले 

मुंबई - मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर नाना तऱ्हेच्या शकला लढवून प्रवाशांना लुटणाऱ्या सराईत आरोपींच्या टोळीचा कुर्ला रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कधी पैसे खाली पडले असल्याचे नाटक करून तर कधी मोबाइल हिसकावून, तर कधी चाकूचा धाक दाखवून हे चोरटे विविध स्थानकांवर नागरिकांना लक्ष करून लुटायचे.

मुंबईच्या कुर्ला रेल्वे टर्मिनल्सवर गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची कायमच वरदळ असते. त्यामुळे घाईगडबडित असलेल्या प्रवाशांना पैस पडले असल्याची बतावणी करून त्याचे लक्ष विचलीत झाल्यावर प्रवाशांचे सामान चोरणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकारचे गुन्हे ही दिवसेंदिवस वाढत होते. 11 जुलै रोजी गावी निघालेल्या दिपा मेहतानी यांना तीन चोरट्यांनी पैसे खाली पडले असल्याचे सांगून लक्ष विचलीत करून त्याची बँग चोरली. या बँगेत दिपा यांचे 13 लाख रुपयांचे सोने होते. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्यासाठी शेकडो सीसीटिव्ही तपासले. अखेर आरोपींची ओळख पटल्यानंतर ही टोळी वांद्रे टर्मिनल्स येथे येणार असल्याची माहिती मिळाली. नंतर पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपी सुरेशकुमार पांडूरंगन याला धारावी पोलिसांनी अटक केली. सुरेशच्या चौकशीतून पोलिसांनी त्याचे साथीदार एम. सेथींलकुमार उर्फ महालिंगम, मूर्ती उर्फ नवनीथ कृष्णन यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा 8 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. 

तर दुसरीकडे विक्रोळीत पटरी शेजारील अंधाराचा फायदा घेऊन एकट्या प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून  विक्की  कुंचीकुर्वे व शोहेब अन्वर शेख यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी अशा प्रकारे अनेकांना लुबाडल्याची कबूली दिली आहे. तर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे महागडे मोबाईल आणि पाकिटं लंपास करणाऱ्या केतन मेहता याला ही पोलिसांनी कुर्ला येथून रंगेहाथ अटक केली आहे. केतनजवळून पोलिसांनी 7 महागडे , घरातून 8 मोबाईल आणि  इतर ठिकाणी लपवलेले 20 मोबाईल हस्तगत केले आहेत. ज्याची बाजारात किंमत 4 लाख 67 हजार इतकी आहे. या सर्वांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईrailwayरेल्वेpassengerप्रवासीKurlaकुर्लाArrestअटकPoliceपोलिस