Gang Rape Video Viral: नातेवाईकाने व्हिडीओ पाहिला; 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 9 जणांनी केला गँगरेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 16:18 IST2021-12-26T16:17:37+5:302021-12-26T16:18:01+5:30
Gang Rape Gujarat: पीडिता एका मित्रासोबत लग्न समारंभाला गेली होती. शेजारच्या गावात लग्न होते. दोघेही आपल्या गावी परतत होते, तेव्हा हा प्रकार घडला होता.

Gang Rape Video Viral: नातेवाईकाने व्हिडीओ पाहिला; 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 9 जणांनी केला गँगरेप
गुजरातच्या डांग जिल्ह्यात 14 वर्षीय मुलीसोबत सामुहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. याचबरोबर तीन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेतले आहे. बलात्काराची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. मात्र, एका नातेवाईकाच्या मोबाईलवर बलात्काराची क्लिप आली आणि प्रकार उघड झाला.
बलात्कारावेळी एका आरोपीने याचा व्हिडिओ काढला होता. यानंतर तो सोशल मिडीयावर अपलोड केला होता. हा व्हिडीओ पीडित मुलीच्या नातेवाईकाने पाहिला. पोलीस निरीक्षक एन एच सवसेता यांनी सांगितले की, अहवा तालुक्यातील या अल्पवयीन मुलीवर तिच्या एका अल्पवयीन मित्राने बलात्कार केला. ती एका लग्न समारंभाला गेली होती. शेजारच्या गावात लग्न होते. दोघेही आपल्या गावी परतत होते, तेव्हा हा प्रकार घडला होता.
या मुलाचे आणखी आठ मित्र रस्त्यात त्यांची वाट पाहत होते. पीडितेला जबरस्तीने रस्त्याशेजारच्या जंगलात नेण्यात आले. तिथे तिच्यावर आणखी दोघांनी बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, नऊपैकी 6 आरोपी हे 20-22 वर्षांचे आहेत. तर तिघे अल्पवयीन आहेत. एका आरोपीने मोबाईलवर व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. घटनेवेळी काही लोक त्या बाजुने येत असल्याचे पाहताच सर्वजण पसार झाले होते.
जाताना त्यांनी मुलीला कुठे वाच्यता केल्यास मारण्याची धमकी दिली होती. व्हिडीओ त्यांनी काढल्याने आणि मारण्याची धमकी दिल्याने ती दोन महिने गप्प होती. परंतू नातेवाईकाने तो व्हिडीओ पाहिला आणि तिच्या कुटुंबाला याची माहिती दिली. यानंतर तिचे कुटुंबीय पोलिसांकडे गेले आणि 23 डिसेंबरला एफआयआर नोंद केला. यानंतर नऊ जणांना अटक करण्यात आली, पैकी 3 अल्पवयीनांना जामिन मिळाला आहे.