शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

ठाण्यातील टोळी दरोड्यासाठी बार्शीत; तिघे पोलिसांच्या तावडीत, दोघे पळाले

By काशिनाथ वाघमारे | Updated: April 18, 2023 16:55 IST

बार्शी-कुर्डूवाडी रस्त्यावर सोमवार, १७ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेच्या दरम्यान एका हॉटेल जवळ वाहन अडवून संशयितांना ताब्यात घेतले.

सोलापूर : बार्शी शहर व परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीने हत्यारे सोबत घेऊन निघालेल्या टोळीला पोलिसांनी पाठलाग पकडलं. या कारवाईत कारमधून आलेल्या पाच जणांपैकी तिघेजण पोलिसांच्या तावडीत सापडले तर दोघे अंधारात पळून जाण्यात यशस्वी झाले.बार्शी-कुर्डूवाडी रस्त्यावर सोमवार, १७ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेच्या दरम्यान एका हॉटेल जवळ वाहन अडवून संशयितांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अंकुश जाधव यांनी बार्शी शहर पोलीसात फिर्याद दिली असून संजय भागवत (रा.कल्याण जि .ठाणे), सुरेश मोहन विश्वकर्मा, सागराज नंदराज भेटवाल (दोघे रा.उल्हासनगर जि. ठाणे) आणि इतर दोन साथिदार अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार सोमवारी रात्री बार्शी शहर पोलीस पथकाची रात्री गस्त सुरू होती. बार्शी कुर्डूवाडी रस्त्यावरुन एक कार (एम. एच. ४७ / के. ९८३१) ही थांबलेली दिसली. संशय येताच पोलिसांचे पथक कारच्या दिशेने गेले. मात्र त्यांना पाहून संशयित कारमधून बाहेर पडले आणि पळत सुटले. पोलिसांनीही त्यांचा पाठलाग केला. या पाठलागात तिघेजण सापडले तर दोघे अंधारातून पसार झाले.मिरीची पावडरसह हत्यारं जप्तकारवाई दरम्यान पोलिसांनी कार जप्त केली. तसेच मिरची पावडर व दरोडा टाकण्यासाठी आणलेली हत्यारे जप्त केली आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तोडरमल करत आहेत.शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीया प्रकरणात अटक केलेल्या तीनही संशयित आरोपिंना बार्शीतील न्यायालयात हजर केले असतसा न्यायधीश जे. ए. झारी त्यांना शुक्रवार, २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी