दिवस अन् रात्री घरफोड्या करणारी टोळी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 18:45 IST2019-05-03T18:44:25+5:302019-05-03T18:45:24+5:30
नालासोपारा - विविध ठिकाणी झालेल्या घरफोडयांचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून आरोपी पकडून गुन्हे उघड करण्यासाठी वालीव गुन्हे शाखेने कंबर कसली ...

दिवस अन् रात्री घरफोड्या करणारी टोळी गजाआड
नालासोपारा - विविध ठिकाणी झालेल्या घरफोडयांचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून आरोपी पकडून गुन्हे उघड करण्यासाठी वालीव गुन्हे शाखेने कंबर कसली होती. गुप्त माहिती मिळाल्यानंतर चार जणांच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून 10 घरफोड्या उघड केले असून मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, वालीव पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या टीमने अंकित उर्फ बंटी यादव (२२), शिवपूजन जयश्री प्रजापती (२४), संदीप प्रेमसिंग बटवाडे (२२) आणि बादल प्रेमसिंग बटवाडे (१९) या चारही जणांना घरफोड्या करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हत्यारासह अटक केले आहे. या चारही जणांनी वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 8 घरफोड्या, माणिकपूर येथे १ घरफोडी आणि वसई येथे १ घरफोडी असे एकूण १० घरफोड्या उघड केला असून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चौघांना वसई न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.