दुध जास्त मिळावं म्हणून गाई-म्हशींना ऑक्सीटोसीन देणाऱ्या टोळीला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 07:31 PM2019-10-02T19:31:16+5:302019-10-02T19:31:46+5:30

याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. 

Gang arrested who were giving oxytocin to cows and buffaloes to get more milk | दुध जास्त मिळावं म्हणून गाई-म्हशींना ऑक्सीटोसीन देणाऱ्या टोळीला बेड्या

दुध जास्त मिळावं म्हणून गाई-म्हशींना ऑक्सीटोसीन देणाऱ्या टोळीला बेड्या

Next
ठळक मुद्देअसे दूषित दूध नागरिकांचे आणि विशेषकरून लहान मुलांच्या आरोग्यास घटक ठरू शकते. या औषधामुळे गाई आणि म्हैस यांच्या गर्भाशयावर विपरीत परिणाम होऊन त्यांच्या आयुर्मानावर देखील परिणाम होतो.

मुंबई - स्वतःच्या फायद्यासाठी गाई आणि म्हशीचे दुध जास्त प्रमाणावर मिळावं म्हणून बेकायदेशीरपणे ऑक्सीटोसीन नावाचे औषध जनावरांना देणाऱ्या टोळीस गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक १० ने अटकअटक केली आहे. ऑक्सीटोसीनचा जनावरांसह मानवी आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

 मुंबईत अनेक ठिकाणी तबेल्यातील गाई आणि म्हशीचे दूध नागरिकांना विकले जाते. काही तबेला व्यावसायिक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जनावरांकडून दूध देण्याच्या प्रमाणात वाढ व्हावी यासाठी गैररित्या ऑक्सीटोसीन नावाचे औषध दुभत्या जनावरांना देतात. काही निर्मिती करणारे व्यापारी तबेल्यातील व्यापाऱ्यांना या औषधाची बेकायदेशीररित्या विक्री करतात. या औषधामुळे गाई आणि म्हैस यांच्या गर्भाशयावर विपरीत परिणाम होऊन त्यांच्या आयुर्मानावर देखील परिणाम होतो. त्याचपप्रमाणे असे दूषित दूध नागरिकांचे आणि विशेषकरून लहान मुलांच्या आरोग्यास घटक ठरू शकते. 

Web Title: Gang arrested who were giving oxytocin to cows and buffaloes to get more milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.