डीएमके पक्षाच्या प्रवक्त्याची हत्या करणारा मुंबईतून गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 09:35 PM2019-03-25T21:35:11+5:302019-03-25T21:38:37+5:30

प्रकाश पंडियन (३१) असं या आरोपीचं नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून तामिळनाडूचे पोलीस त्याच्या मागावर होते.

Gajad from Mumbai murdered DMK spokesman | डीएमके पक्षाच्या प्रवक्त्याची हत्या करणारा मुंबईतून गजाआड 

डीएमके पक्षाच्या प्रवक्त्याची हत्या करणारा मुंबईतून गजाआड 

Next
ठळक मुद्देतामिळनाडूमध्ये  २०१२ मध्ये राजकीय वादातून आरोपीसह सात जणांनी डीएमकेचे प्रवक्ते एस. आर नागराजन हे सहपत्नीक दर्शनासाठी जात असताना त्यांची हत्या  घडवून आणली. तामिळनाडूत दोन वर्षापासून नागराजन यांच्या हत्येच्या खटल्यात तो उपस्थित राहिला नाही.तामिळनाडू पोलिसांनी मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांची मदत घेतल्यानंतर प्रकाशला गजाआड करण्यात यश आलं.

मुंबई - तामिळनाडूतल्या डीएमके ( द्रविड मुनेत्र कडगम) या पक्षाच्या प्रमुख प्रवक्त्याची हत्या करणाऱ्या फरार आरोपीस मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अँटॉप हिलमधून अटक केली आहे. प्रकाश पंडियन (३१) असं या आरोपीचं नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून तामिळनाडूचे पोलीस त्याच्या मागावर होते.

तामिळनाडूमध्ये  २०१२ मध्ये राजकीय वादातून आरोपीसह सात जणांनी डीएमकेचे प्रवक्ते एस. आर नागराजन हे सहपत्नीक दर्शनासाठी जात असताना त्यांची हत्या  घडवून आणली. या हत्येनंतर पोलिसांनी प्रकाशसह सात जणांना अटक केली. अटकेनंतर सात जणांविरोधात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. कालांतराने या सात जणांना न्यायालयाने जामिनावर सोडले. आरोपी जामीनावर बाहेर आल्यानंतर नागराजन यांचा बदला घेण्यासाठी डीएमकेच्या कार्यकर्त्यांनी या सातपैकी एकाची हत्या केली. यानंतर तामिळनाडूतील न्यायालयाने इतर सहा जणांना पोलिस संरक्षण दिले होते. 

काही महिन्यानंतर प्रकरण शांत झाल्याचे पाहून सहा जणांना दिलेले संरक्षण पोलिसांनी काढून घेतले. हे कळताच डीएमकेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा सहा जणांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली. त्यामुळे भितीपोटी प्रकाश मुंबईला पळून आला. अँटॉप हिल परिसरात तो ओळख लपवून राहत होता. तामिळनाडूत दोन वर्षापासून नागराजन यांच्या हत्येच्या खटल्यात तो उपस्थित राहिला नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरोधात अटक वाॅरंट काढले. त्यानुसार काही महिन्यापूर्वी तामिळनाडूचे पोलीस मुंबईत तो राहत असलेल्या ठिकाणी त्याचा शोध घेण्यास आले होते. मात्र प्रकाश पोलिसांच्या हाती लागला नाही. या वेळी तामिळनाडू पोलिसांनी मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांची मदत घेतल्यानंतर प्रकाशला गजाआड करण्यात यश आलं. आता प्रकाशचा ताबा तामिळनाडू पोलिसांना देण्यात आला आहे.

Web Title: Gajad from Mumbai murdered DMK spokesman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.