In the front of Milind Soman girl's mobile robbed; Arrested by Police | मिलिंद सोमणच्या देखतच मुलीचा मोबाईल हिसकावला; पोलिसांनी केली अटक
मिलिंद सोमणच्या देखतच मुलीचा मोबाईल हिसकावला; पोलिसांनी केली अटक

ठळक मुद्दे अभिनेता मिलिंद सोमण हे नियमितपणे शिवाजी पार्क येथे वॉकसाठी येतात त्यावेळी बुधवारी पहाटे ५.४१ वाजताच्या सुमारास घटना घडली. अशा प्रकारच्या चोरीला आळा बसावा म्हणून याठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

मुंबई -  मूड रिफ्रेश करण्यासाठी तसेच वॉकसाठी तुम्ही जर शिवाजी पार्कात येत असाल तर सावधानता जरूर बाळगा वॉकसाठी आलेल्या महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून जाण्याची घटना नुकतीच शिवाजी पार्क परिसरात घडली. अभिनेता मिलिंद सोमण हे नियमितपणे शिवाजी पार्क येथे वॉकसाठी येतात बुधवारी पहाटे ५.४१ वाजताच्या सुमारास ते आणि  त्यांच्या ग्रुपपैकी बरिस्ता हॉटेलजवळ उभ्या असलेल्या एका मुलीच्या हातातील मोबाईल हिसकावून बाईकवर पळून जाणाऱ्या मोबाईल चोरास शिवाजी पार्क पोलिसांनी गुरुवारी अटक केली. 

फोटो काढत असताना समोरून आलेल्या बाईकस्वाराने तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या पथकाने आरोपीना सिद्धिविनायक परिसरातून अटक केली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमोद सूर्यवंशी, संदीप पाटील, सतीश लिमये आणि सागर पारडे यांनी आरोपींचा माग काढत त्यांना शिताफीने अटक केली. वॉकसाठी आलेल्या मिलिंद सोमण यांच्या एका ग्रुपमधील मुलीच्या हातातून शिवाजीपार्क येथील बरिस्ता समोरून मोबाईल हिसकावून बाईकवरून पळून जाणाऱ्या या मोबाईल चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हेरिटेज वास्तू म्हणून शिवाजी पार्ककडे पहिले जाते. मात्र, मोबाईल चोरीची घटना घडल्यापासून नागरिक धास्तावले असून अशा प्रकारच्या चोरीला आळा बसावा म्हणून याठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.


Web Title: In the front of Milind Soman girl's mobile robbed; Arrested by Police
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.