शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 13:58 IST

Rape Case : वारंवार जबरदस्तीने व्हिडीओचा धाक दाखवत आतापर्यंत तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार करण्यात आले असल्याची माहिती पुढे येत आहे.त्या तरुणीकडे वारंवार शरीर सुखाची मागणी वाढू लागल्याने मानसिक खच्चीकरण झालेल्या त्या मुलीने आपल्या आत्याला आपल्यावरील अत्याचाराची सर्व हकीकत सांगितली.

हितेंद्र नाईक

पालघर- मुरबे येथील एका अल्पवयीन असलेल्या महाविद्यालयीन मुलीवर मागील सहा महिन्यांपासून बलात्कार करून त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवून सामूहिक अत्याचार करणाऱ्या मुरबे येथील तीन तरुणांविरोधात बलात्कार, पोस्को अंतर्गत सातपाटी सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पालघर न्यायालयाने आरोपींना 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुरबे येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीचे आपल्याच गावातील तारापूर औद्योगिक वसाहती मधील कारखाण्यात काम करणाऱ्या हर्षल देव रा.मुरबे (22वर्ष) ह्यांच्याशी प्रेम जडले. ह्या प्रेम संबंधातून त्याची अनेक वेळा जवळीक वाढल्याने आरोपी प्रियकराने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली.परंतु मी अजूनही अल्पवयीन असल्याने मी सज्ञान झाल्यावर लग्न करू असे त्या मुलीने त्याला समजावून सांगितले.परंतु हर्षल ने जबरदस्ती करीत तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित करून त्याचा एक व्हिडिओ ही काढला.ह्या व्हिडियोची अनेक दिवस मजा लुटून हर्षल ने तो व्हिडीओ आपल्या काही मित्रांना दाखवला.त्या व्हिडिओचा दुरुपयोग करीत त्याचे मित्र अभिषेक देव आणि तुषार नलावडे दोघेही राहणार मुरबे ह्यांनी आपल्या मित्राच्या प्रेयसीशी थेट संपर्क साधून मित्राशी शरीर संबंध प्रस्थापित केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास गावात सर्वत्र आपली व आपल्या कुटुंबियांची बदनामी होईल ह्या भीतीतून मागील अनेक महिन्यापासून तिच्याशी प्रियकर आणि त्यांच्या मित्राने आपल्याशी संबंध ठेवल्याचे त्या मुलींनी तक्रारीत म्हटले आहे.वारंवार जबरदस्तीने व्हिडीओचा धाक दाखवत आतापर्यंत तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार करण्यात आले असल्याची माहिती पुढे येत आहे. त्या तरुणीकडे वारंवार शरीर सुखाची मागणी वाढू लागल्याने मानसिक खच्चीकरण झालेल्या त्या मुलीने आपल्या आत्याला आपल्यावरील अत्याचाराची सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर त्या तरुणींनी आपल्या कुटुंबियांसह सातपाटी सागरी पोलीस गाठले. आणि तीन आरोपी विरोधात सामूहिक बलात्कार, आणि लैगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण(पोस्को) आदी कलमान्वये सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोस्को कायद्यात 2018 च्या उन्नाव आणि कथुवा येथे बलिकेवर झालेल्या अत्याचारा नंतर नवीन बदल करण्यात आले असून आता आरोपीनी 16 वर्षावरील मुलीवर बलात्कार केल्यास आरोपीना 10 ते 20 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सदर आरोपींना पोलिसांनी अटक केल्या नंतर त्यांना सोमवारी पालघर न्यायालयात हजर केले असता त्यांना 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती सपोनि सुधीर धायरकर ह्यांनी दिली.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसpalgharपालघरPOCSO Actपॉक्सो कायदा