शहरं
Join us  
Trending Stories
1
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
2
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
3
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
4
"रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
5
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
6
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
7
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
8
मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना; चायनीज मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
9
"विराट आणि रोहित सतत गौतम गंभीरशी..."; टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने सगळंच सांगून टाकलं!
10
मुंबई मनपामध्ये भाजपापेक्षा स्ट्राईक रेट चांगला असल्यास महापौरपदावर दावा करणार का? शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले...
11
Affordable Cars: कमी पगार असूनही खरेदी करू शकता 'या' ५ स्वस्त आणि मस्त कार!
12
KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
विजय केडिया यांची मोठी गुंतवणूक, या स्मॉलकॅप स्टॉकवर लावला तगडा डाव; खरेदी केले १००००००० शेअर
14
Makar Sankranti 2026: संक्रांतीच्या संध्याकाळी तुळशीजवळ करा 'हे' २ छोटे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा!
15
पालक पनीर गरम केल्याने राडा; युनिव्हर्सिटीला २ भारतीय विद्यार्थ्यांना द्यावे लागले १.८ कोटी
16
US-इराण लढाईत पाकिस्तान अडकला, ३ संकटांनी घेरलं; असीम मुनीर यांनी बोलावली तातडीची बैठक
17
धुळ्यात हजारो मतदान कार्डांचा साठा सापडला; एमआयएमचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
18
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
19
बाजारात घसरण होऊनही गुंतवणूकदारांनी ३२ हजार कोटी कमावले; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
20
Makar Sankranti 2026: मकर संक्रांत ते रथसप्तमी; हळदी-कुंकवासाठी हाच काळ का निवडला जातो?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर फिल्मी स्टाईल 'गँगवार'; थारने धडक दिली, दोन्ही गटांकडून तुफान गोळीबार; CCTV फुटेज व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 14:47 IST

राजस्थानमध्ये दोन गटांमध्ये रस्त्यावरच गँगवॉर झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

Rajasthan Gangwar:राजस्थानच्या कोटपूतली–बहरोड जिल्ह्याच्या बानसूर शहरातून एका थरकाप उडवणाऱ्या 'गँगवार'चा व्हिडिओ समोर आला आहे. बुधवारी हरसोरा रोडवर पूर्ववैमनस्यातून दोन गटांमध्ये जोरदार सशस्त्र संघर्ष झाला. थार आणि स्विफ्ट कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका दुचाकीला धडक दिली, त्यानंतर दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार झाला. हा सगळा प्रकार तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशत पसरली होती.

गाड्यांची धडक आणि गोळीबाराची सुरुवात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिपाल गुर्जर आणि त्याचे साथीदार घनश्याम गुर्जर आणि कालू हे दुचाकीवरून जात असताना, बानसूरच्या दिशेने आलेल्या थार आणि स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक बसण्यापूर्वीच दुचाकीवर मागे बसलेला एक तरुण खाली उतरला आणि त्याने थार गाडीवर गोळीबार सुरू केला. धडक लागल्यानंतर दुचाकीस्वार खाली पडताच, स्विफ्ट कारमधील हल्लेखोरांनी त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी त्यांनीही गोळीबार सुरू केला. जखमी झालेल्या दुचाकीस्वारांपैकी एमपी गुर्जर याने तत्काळ पिस्तूल काढून कारमधील हल्लेखोरांवर जोरदार गोळीबार केला.

दोन्ही गटांकडून झालेल्या या गोळीबारामुळे काही क्षणांतच रस्त्यावर युद्धभूमीचे स्वरूप आले आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली. डीएसपी मेघा गोयल यांनी या घटनेबद्दल माहिती दिली आहे. त्यांच्या मते, ही घटना महिपाल गुर्जर आणि विनोद पोसवाल या दोन गटांमधील जुन्या वैमनस्यातून घडली आहे. पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारींवरून एकमेकांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये, दुचाकीस्वार जीव वाचवण्यासाठी बाजूच्या एका भिंतीवर चढून गोळीबार करत होते. दुचाकीस्वार पळून गेल्यानंतर, थार आणि स्विफ्टमधील हल्लेखोर गाडीतून उतरले आणि त्यांनी लोखंडी रॉडने दुचाकी तोडून दहशत निर्माण केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांच्या अटकेसाठी नाकाबंदी आणि शोध मोहीम तीव्र केली आहे.

सध्या सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, फिल्मी स्टाईलमध्ये झालेल्या या गँगवारने राजस्थानमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या गोळीबारात कोणी गंभीर जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajasthan: Gang war erupts; gunfire, car ramming caught on CCTV.

Web Summary : A gang war in Rajasthan's Bansur saw rivals ramming vehicles and exchanging gunfire. The incident, stemming from old grudges, involved groups in cars attacking a motorcycle. Police are investigating attempted murder charges after the broad daylight clash.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानcctvसीसीटीव्ही