शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडियावरिल मैत्री अन् व्यावसायिकाला सव्वा कोटीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 22:16 IST

Cyber Crime : त्रिकूट जाळयात,  सायबर पोलिसांची कारवाई 

ठळक मुद्देराणी पंकज सारंग (४२), रुचिका हातीपकर (२४) आणि प्रसाद भानुशाली (२७) अशी अटक करण्यात आलेल्या त्रिकूटाचे नाव आहे.

मुंबई : सोशल मिडियावरुन ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. यातूनच आजारी तसेच आर्थिक अड़चण असल्याचे सांगत ५ महिन्यात व्यावसायिकाला सव्वा कोटी रूपयांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार सायबर विभागाच्या कारवाईत समोर आला आहे. याप्रकरणी उत्तर विभागाच्या सायबर पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना अटक केली आहे.        

राणी पंकज सारंग (४२), रुचिका हातीपकर (२४) आणि प्रसाद भानुशाली (२७) अशी अटक करण्यात आलेल्या त्रिकूटाचे नाव आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील रहिवासी असलेली राणी यातील मुख्य आरोपी आहे. तिने टिंडर अँँपवरून व्यावसायिकासोबत ओळख झाली. तिने तक्रारदार यांना त्यांच्या कंपनीतील सहकाऱ्याची पत्नी असल्याचे सांगत बनावट फेसबुक अकाउंटवरून रिक्वेस्टही पाठवली. दोघांमध्ये संवाद सुरु झाला. पुढे स्वतः तसेच मुले आजारी असल्याचे सांगत पैसे उकळण्यास सुरुवात केली. तिच्या अन्य साथीदारांनीही मध्यस्थी घेत वेगवेगळी कारणे पुढे करत पैसे काढले.       

राणीने सुरु केलेल्या नाटकात तिचा मृत्यू झाल्याचे भासवून 

तिच्या मुलीने आणखीन पैसे घेतले. यात १८ एप्रिल ते २१ सप्टेबर दरम्यान ठगांनी १ कोटी ११ लाख ७९ हजार रुपये उकळले आहे. पुढे टोळीतील सरस्वती नावाच्या महिलेने पैसे न दिल्यास आत्महत्येची धमकी दिली. अखेर यात फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी सायबर पोलिसांकड़े धाव घेतली.  तांत्रिक तपासातून पथक अटक त्रिकूटापर्यंत पोहचले. यात, त्यांच्या बँक खात्यातील १७ लाख रुपये गोठविण्यात आले आहे. तसेच त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरु आहे. ठगीच्या रक्कमेतून सोने खरेदी             

ठगीच्या रक्कमेतून खरेदी केलेले २२ लाख किंमतीचे दागिने सायबर पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच त्यांच्या अन्य बँक खात्याचे डेबिट, क्रेडिट कार्ड, पासबुक, चेकबुकही पथकाने जप्त केले आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसArrestअटकFacebookफेसबुक