शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

लंडनच्या तरुणासोबतची मैत्री पडली महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 2:39 AM

कोपरखैरणे सेक्टर ८ येथे राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणीसोबत हा प्रकार घडला आहे. तिची बेन्सन मर्गन नावाच्या व्यक्तीसोबत फेसबुकवर ओळख झाली होती.

नवी मुंबई : फेसबुकवरून लंडनच्या तरुणासोबत झालेली मैत्री तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. त्याने लग्नाचे आमिष दाखवून भेटीसाठी भारतात येत असल्याचे सांगितले. परंतु दिल्ली विमानतळावर आल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेत अडकल्याचे सांगून स्वत:च्या सुटकेच्या बहाण्याने तिला ९ लाख ७७ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.कोपरखैरणे सेक्टर ८ येथे राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणीसोबत हा प्रकार घडला आहे. तिची बेन्सन मर्गन नावाच्या व्यक्तीसोबत फेसबुकवर ओळख झाली होती. त्याने तो लंडनचा रहिवासी असल्याचे सांगून तिच्याशी मैत्री केली होती. त्यांच्यातली जवळीक वाढल्यानंतर त्याने भेटीसाठी भारतात येत असल्याचे सांगितले. याचदरम्यान २ मार्चला सदर तरुणीला एका व्यक्तीने फोन करून दिल्ली विमानतळावरील अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. त्यांनी बेन्सन याच्याकडे ५० हजार पाउंड आढळल्याने त्याला ताब्यात घेतले असून दंडाची रक्कम भरल्यानंतर त्याला सोडले जाईल, असेही सांगितले. या वेळी त्या व्यक्तीने बेन्सन याच्यासोबतही तिचे बोलणे करून दिले. या वेळी बेन्सन याने आपल्याला डांबून ठेवले असून, विमानतळावरून सुटल्यानंतर तिला दंडाची भरलेली रक्कम परत देतो, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणीने सुरुवातीला ६५ हजार रुपये भरले. परंतु त्यानंतरही वेगवेगळ्या कारणांसाठी तिच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. तर सदर तरुणीही फोनवरील व्यक्ती सांगेल त्याप्रमाणे संबंधित बँक खात्यात पैसे पाठवत होती. तिने ९ लाख ७७ हजार रुपये भरले. परंतु संपूर्ण प्रकरणावर संशय आल्याने तिने पैसे पाठवणे बंद केले. शनिवारी बेन्सन याने तिला फोन करून लंडनला जात असल्याचे सांगितल्याने तिने कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमFacebookफेसबुक