शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

आयफोनमधून रील बनवण्यासाठी अल्पवयीन मुलांनी केली मित्राचीच हत्या; आरोपीच्या वडिलांनीच रचला होता कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 16:26 IST

उत्तर प्रदेशात रील्सच्या नादात अल्पवयीन मुलांनी एका तरुणाची हत्या केली.

Crime News: जगभरात सध्या इन्स्टाग्राम रील्सने सर्वांनाच वेड लावलं आहे. अनेकांसाठी हे पैसे कमावण्याचे साधन देखील झालंय. यातून आलेली श्रीमंती दाखवण्याचा प्रयत्न काही इन्फ्लुएंसर करत असतात. याच नादात दोन अल्पवयीन मुलांनी एका तरुणाचा जीव घेतला. लग्नासाठी बंगळुरूहून उत्तर प्रदेशातील बहराइचला आलेल्या एका तरुणाची दोन अल्पवयीन मुलांनी अॅपल आयफोनच्या हव्यासापोटी हत्या केली. आयफोनमधून चांगल्या दर्जाचे रील्स बनवून पैसे कमवायचे असल्याने दोघांनी १९ वर्षीय तरुणाला संपवलं.

महागड्या आयफोनने रील बनवण्याच्या नादात चार जणांनी केलेलं कृत्य त्यांना आयुष्यभरासाठी विसरता येणार नाही. मामाच्या लग्नाला आलेल्या या मुलांनी त्यांचाच मित्र शादाबकडे आयफोन पाहिला तेव्हा त्यांची नियत फिरली. चौघांनी शादाबला एका निर्जन ठिकाणी नेले. आधी त्यांनी त्याच्या मानेवर वार केला आणि नंतर विटेने डोकं ठेचून त्याची हत्या केली. हा सगळा कट एका कथित पत्रकाराने आणि एका आरोपी मुलाच्या पित्याने रचला होता. या प्रकरणात पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह एका पत्रकाराला अटक केली आहे तर फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

बंगळुरुतून लग्नासाठी आलेल्या १९ वर्षीय शादाबची हत्या करून त्याचा मृतदेह बागेत फेकण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या  गावातील बशर आणि फरीद यांनी त्या शादाबची चाकूने वार करून हत्या केली. चौकशी केली तेव्हा हत्येचे कारण एक महागडा मोबाईल असल्याचे समोर आलं. त्यांना रील बनवून पैसे कमवायचे होते, पण त्यांच्याकडे चांगला मोबाईल नव्हता. मामाच्या लग्नासाठी गावात आलेल्या शादाबकडे आयफोन असल्याचे पाहून बसरने त्याचे वडील आवेद अहमद उर्फ ​​राजू नेता आणि चुलत भाऊ झुल्फिकार उर्फ ​​रेहान यांना सांगितले. त्यावेळी आयफोनने रील बनवल्यावर फॉलोअर्सची संख्या वाढेल असं सांगितल्याने त्यांनी शादाबला मारण्याची योजना आखली. २० जूनला बसर आणि फरीद यांनी शादाबला रील बनवण्यासाठी सोबत नेले आणि त्याची हत्या केली.

शादाबला त्याचे मित्र त्याला घेऊन गेले होते. तो घरी परतला नाही तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी दुसऱ्या दिवशी  बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. पोलिसांना तपास करत असताना शादाबचा मृतदेह घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पेरूच्या बागेत आढळला. पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा त्यांना शादाबच्या मित्रांवर संशय आला. कसून चौकशी केली असता अल्पवयीन आरोपींनी सगळा घटनाक्रम सांगितला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस