दारूच्या नशेत चाकूने वार करून मित्राची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 20:03 IST2019-12-02T20:00:11+5:302019-12-02T20:03:28+5:30

आरोपीला अटक; एमआयडीसी पोलिसांनी केली कारवाई 

friend murder to Person to in andheri | दारूच्या नशेत चाकूने वार करून मित्राची केली हत्या

दारूच्या नशेत चाकूने वार करून मित्राची केली हत्या

ठळक मुद्दे. फिरोज हमीद खान (५४) असे हत्या झालेल्याचे नाव असून या प्रकरणी त्याचा मित्र अब्बास याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.महाकाली गुफा रोड येथील रघुनाथ चाळीतील फिरोज याच्या घरी दोघेजण रविवारी रात्री मद्यपान करत बसले होते. नशेमध्ये त्याच्यात वाद सुरु झाला.

मुंबई - दारू पित असताना झालेल्या वादातून मित्रावर चाकूने वार करून हत्या करण्याची घटना रविवारी अंधेरीत घडली. फिरोज हमीद खान (५४) असे हत्या झालेल्याचे नाव असून या प्रकरणी त्याचा मित्र अब्बास याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

दोघेजण गुन्हेगारी वृत्तीचे असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसाकडून सांगण्यात आले. महाकाली गुफा रोड येथील रघुनाथ चाळीतील फिरोज याच्या घरी दोघेजण रविवारी रात्री मद्यपान करत बसले होते. नशेमध्ये त्याच्यात वाद सुरु झाला. यावेळी अब्बासने चिडून त्याच्या पाठीवर चाकूने वर केले. तो रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडल्यानंतर अब्बास तेथून निघून गेला. फिरोजला त्याचा भाऊ व अन्य नातेवाईकांनी कुपर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना त्याचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला.

Web Title: friend murder to Person to in andheri