गर्लफ्रेन्डवर वाईट नजर टाकल्याने मित्राने मित्रालाच दिली भयावह शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 11:59 IST2022-04-22T11:53:23+5:302022-04-22T11:59:04+5:30
Bihar Crime News : मैत्रीचं नातं इतर नात्यांपेक्षा मोठं मानलं जातं. पण छपरामध्ये एका मित्राने आपल्या गर्लफ्रेन्डसाठी मित्राचीच हत्या केली.

गर्लफ्रेन्डवर वाईट नजर टाकल्याने मित्राने मित्रालाच दिली भयावह शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Bihar Crime News : बिहारच्या सारण जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणावर आपल्याच मित्राची हत्या करण्याचा आरोप आहे. असं सांगितलं जात आहे की, गर्लफ्रेन्डच्या नादात ही हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणावरून पडदा उठवत हैराण करणारा खुलासा केला आहे. दोन आरोपींना ताब्यात घेतल्यावर चौकशी केली तेव्हा हा खुलासा झाला. पोलिसांनी दावा केला आहे की, मृत तरूणाचं त्याच्या मित्राच्या गर्लफ्रेन्डसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. हत्येचा आरोपी म्हणाला की, मित्राने जेव्हा त्याच्या प्रेयसीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्याची हत्या केली.
मैत्रीचं नातं इतर नात्यांपेक्षा मोठं मानलं जातं. पण छपरामध्ये एका मित्राने आपल्या गर्लफ्रेन्डसाठी मित्राचीच हत्या केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ४ एप्रिलला एका तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. मृत तरूणाचं नाव रंजन कुमार आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिषेक कुमार आणि कृष्ण कुमार यांना अटक केली होती. हे दोघे रंजन जवळचे मित्र होते. पोलिसांनुसार, आरोपींनी सांगितलं की, कृष्ण कुमारच्या गर्लफ्रेन्डसोबत रंजन कुमारचं प्रेम प्रकरण सुरू होतं. त्यांनी सांगितलं की, रंजनला तरूणीला ब्लॅकमेल करून तिच्यासोबत संबंध ठेवायचे होते.
रंजन कुमारच्या या इच्छेबाबत कृष्ण कुमारला समजलं तर तो संतापला. याच रागात कृष्ण कुमारने रंजन कुमारची गळा चिरून हत्या केली.
एसपी संतोष कुमार यांनी सांगितलं की, हत्येप्रकरणी अज्ञात लोकांविरोधात प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली होती. नंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. तेव्हा अभिषेक कुमारला चौकशीसाठी बोलवलं होतं. अभिषेखने पोलिसांना कृष्ण कुमारबाबत सांगितलं.
नंतर पोलिसांनी कृष्ण कुमार याची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की, रंजन कुमार त्याच्या गर्लफ्रेन्डला ब्लॅकमेल करत होता. हे त्याला समजलं तर तो संतापला. याच रागात त्याने मित्र रंजन कुमारची हत्या केली. अभिषेक कुमारच्या मदतीने त्याने रंजन कुमारला एका अज्ञात स्थळी बोलवलं आणि अभिषेक सोबत मिळून त्याची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह तिथेच सोडून फरार झाले.