शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘एमएमआरडीए’ला १६,६००.४० कोटींची फसवी गॅरंटी; एसआयटीमार्फत तपास करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 06:51 IST

एसबीआयने कोणती शहानिशा न करता युरो बँकेचा बीआरसंदर्भातील स्विफ्ट मेसेज प्रमाणीकृत केला आहे, असा आरोप प्रकाश यांनी याचिकेद्वारे केला आहे. 

मुंबई : ठाणे-बोरिवली ट्विन ट्यूब या तीन पदरी बोगद्यातील हायवे बांधण्यासाठी एमएमआरडीएने खासगी कंपनी मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्टक्चर लि.कडून १६,६००.४० कोटी रुपयांची फसवी बँक गॅरंटी स्वीकारल्याचा दावा करत संबंधित व्यवहाराची सीबीआय किंवा एसआयटीद्वारे तपास करण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 

परदेशातील एका कंपनीने मेघा इंजिनिअर्सतर्फे एमएमआरडीएला फसवी बँक गॅरंटी दिली असल्याचा दावा ज्येष्ठ आणि शोध पत्रकार रवी प्रकाश यांनी जनहित याचिकेद्वारे केला आहे. मुख्य न्या. आलोक आराधे व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सुनावणीसाठी होती. 

बीआरसंदर्भातील स्विफ्ट मेसेज प्रमाणीकृत सेंट लुसिया येथे स्थित असलेली, इंग्लंड आणि वेल्सच्या कायद्यांतर्गत चालणारी युरो एक्झिम बँक ही आरबीआयच्या मान्यताप्राप्त परदेशी बँकेत येत नाही. तरीही युरो एक्झिम बँकेने मेघा इंजिनिअर्सच्या वतीने एमएमआरडीएला  १६,६००.४० कोटी रुपयांची बँक गॅरंटी दिली आहे. तसेच एसबीआयने कोणती शहानिशा न करता युरो बँकेचा बीआरसंदर्भातील स्विफ्ट मेसेज प्रमाणीकृत केला आहे, असा आरोप प्रकाश यांनी याचिकेद्वारे केला आहे. 

जनहितयाचिकेत नेमके काय म्हटले आहे?कार्यसुरक्षेची रक्कम केवळ राष्ट्रीयीकृत किंवा शेडयूल बँकांनी जारी केलेल्या बीआरद्वारे स्वीकारण्यात येईल, असे परिपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने १९ स्पटेंबर २०१७ रोजी काढले आहे. १५ जून २०१८ मध्ये एमएमआरडीएच्या वित्त विभागाने असेच परपरित्रक जारी केल्याचे याचिकेत म्हटले आहे. सीबीआय किंवा एसआयटीला या व्यवहाराचा तपास करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच एमएमआरडीएला मेघा इंजिनियर्सकडून प्रकल्पाचे कंत्राट काढून घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यासाठी  ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी हे न्यायालयात उपस्थित होते. 

टॅग्स :mmrdaएमएमआरडीए