शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

पुराणिक बिल्डर्सविरुद्ध फसवणुकीचा खटला दाखल, सव्वातीन कोटींची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 12:00 AM

वर्तकनगर येथील एकता सोसायटी बिल्डिंग क्रमांक १८ च्या रहिवाशांनी भारतीय दंड संहिता कलम ४१८, ४२३, ४२७, ४०६ आणि ४२० नुसार ही तक्रार न्यायालयात दाखल केली आहे.

ठाणे : इमारतीच्या मूळ रहिवाशांना पुनर्विकासाच्या कालावधीमध्ये पर्यायी ठिकाणचे भाडे न देणे, तसेच प्रत्येकी अडीच लाखांची कॉर्पस फंडाची रक्कम ४० सभासदांना न देता पुनर्विकास कराराच्या अटीशर्तींचा भंग केल्याप्रकरणी ठाण्यातील पुराणिक बिल्डर्सविरुद्ध फसवणुकीचा खटला नुकताच दाखल केला आहे. यामध्ये विकासकाने जून २०२० अखेरपर्यंत तब्बल तीन कोटी २४ लाखांची रक्कम थकविल्याचीही माहिती रहिवाशांनी ठाणे न्यायालयात दिली आहे.वर्तकनगर येथील एकता सोसायटी बिल्डिंग क्रमांक १८ च्या रहिवाशांनी भारतीय दंड संहिता कलम ४१८, ४२३, ४२७, ४०६ आणि ४२० नुसार ही तक्रार न्यायालयात दाखल केली आहे. पुराणिक बिल्डर्सच्या फॉर्च्युन इन्फ्राक्रेटर्स प्रायव्हेट लि.च्या शैेलेश पुराणिक, श्रीकांत पुराणिक, योगेश पुराणिक आणि निलेश पुराणिक तसेच त्यांच्या कंपनीविरुद्ध हा खटला दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कथित आरोपींनी इमारत क्रमांक १८ च्या सोसायटीबरोबर नोंदणीकृत जो करारनामा ३० जून २०१६ रोजी केला होता, त्याच्या अटींचा भंग केला आहे. पुराणिक यांनी गेले वर्षभर रहिवाशांचे पर्यायी जागेचे भाडे दिलेले नाही. तसेच कॉर्पस फंड म्हणून प्रत्येकी दोन लाख ५० हजारांची रक्कमही दिली नाही. याशिवाय, सोसायटीतील रहिवाशांसोबत वैयक्तिक करार केला नाही. सोसायटीबरोबर जो करार झाला, त्यातील अटीनुसार विकासकांनी त्यांच्या सदनिका कर्ज घेतेवेळी गहाण ठेवता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. तरीही, त्या गहाण ठेवल्या आहेत. याशिवाय, इतरही अटींचा भंग केल्याने सोसायटीने एकूण १६ पत्रे तसेच वकिलांमार्फतीने चार नोटिसाही दिल्या आहेत. यापैकी कशाचेही उत्तर देण्यात आले नाही. सोसायटीचे वयस्कर पदाधिकारी विकासकाच्या कार्यालयात जाऊन भेटण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना सुरक्षारक्षकांच्या मार्फतीने हाकलून भेट नाकारली जाते, असे आरोप केले आहेत. आता रहिवासी वास्तव्याला असलेल्या ठिकाणचे भाडे थकल्याने पर्यायी जागाही सोडावी लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये काहींनी आपले मूळ गाव गाठले आहे. तर, काही बदलापूरसारख्या ठिकाणी वास्तव्याला गेले. जूनअखेरीस कथित आरोपींनी या सोसायटीला तीन कोटी २४ लाख २७ हजार ७६९ रुपये इतके देणे आहे. मिशन बिगिनअंतर्गत शासनाने बांधकामास परवानगी दिली आहे. तरीही, पुनर्विकासाचे काम सध्या बंद आहे. १ जुलै रोजी सोसायटीतर्फे अ‍ॅड. प्रशांत पंचाक्षरी यांनी दाखल केलेल्या या प्रकरणाची सुनावणी २७ जुलै रोजी होणार आहे. यासंदर्भात वारंवार प्रयत्न करुनही शैलेश पुराणिक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.यासंदर्भात पुराणिक बिल्डर्सविरुद्ध इमारत क्रमांक १८ च्या वतीने ठाणे न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. विकासकाकडे तीन कोटी २४ लाख २७ हजार ७६९ रुपयांची थकबाकी आहे. तसेच पुनर्विकास कराराच्या अनेक अटींचा भंग केल्याने हा खटला न्यायालयात दाखल केला आहे.-अ‍ॅड. प्रशांत पंचाक्षरी, ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी