एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 15:31 IST2022-12-05T15:31:07+5:302022-12-05T15:31:46+5:30
एका भामट्याने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून परस्पर पैसे काढून फसवणूक केली.

एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक
मीरारोड - लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एटीएम मधून पैसे काढण्यास गेलेल्या रवींद्र परसराम यांची एका भामट्याने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून परस्पर पैसे काढून फसवणूक केली.
रविंद्र हे शनिवारी भाईंदर पूर्वेच्या बंदरवाडी येथील ओस्वाल बिल्डिंगच्या एस.बी.आय. बँकेच्या एटीएम मध्ये गेले होते. कार्ड एटीएम मशीन मध्ये जात नसल्याने त्यांच्या मागे उभ्या असणाऱ्या एका अनोळखी तरुणाने मदत करतो सांगून त्यांचे कार्ड एटीएम मशिनमध्ये जोरात ढकलले. त्या नंतर पैसे निघाले मात्र कार्ड मशीन मध्ये अडकून राहिले.
बराच वेळ प्रयत्न करून सुद्धा कार्ड निघत नसल्याने रवींद्र लघुशंकेसाठी बाहेर आले. नंतर मात्र मशीन मध्ये अडकलेले कार्ड दुसरे असल्याचे तसेच त्या दरम्यान त्यांच्या कार्ड द्वारे २८ हजार ५०० रुपये परस्पर काढून घेण्यात आल्याचे त्यांना कळले. नवघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.